आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Photos According To The Zodiac Chanting These Mantras Will Be Rich

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : राशीनुसार करा या मंत्राचा जप, व्हाल मालामाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात प्रत्येक जन झटपट श्रीमंत होण्याच्या मागे लागला आहे. श्रीमंत होण्यासाठी कोणतेही काम करण्यास सर्वजण तयार आहेत, तरीही श्रीमंत होणे प्रत्येकाच्या नशिबात नाही. ज्योतिष शास्त्रात असे अनेक मंत्र सांगितले गेले आहेत. त्या मंत्रांचा विधिवत जप केला तर महालक्ष्मी प्रसन्न होऊन भक्ताला मालामाल करून टाकते. राशीनुसार हे मंत्र पुढील प्रमाणे आहेत.
मेष - मेष रास (चू, चे, ला, ल, ली, लू, ले लो, अ) या अक्षरांपासून नाव सुरु होणारे व्यक्ती आकर्षक आणि प्रभावशाली असतात. यांचे व्यक्तिमत्व रुबाबदार असते त्यामुळे यांच्याकडे कोणतही मुलगी लवकर आकर्षित होते. या लोकांनी या मंत्राचा जप करावा - ऊँ ऐं क्लीं सौ:
वृषभ - वृषभ रास असणारे ज्यांच्या नावाचे पहिले अक्षर (ई, उ, ए, ओ, वा, वि, वू, वे, वो) याने सुरु होते ते उत्तम प्रकारचे प्रेमी असतात. वृषभ राशीचे लोक प्रेम सबंध तयार करण्यात पटाईत असतात. या लोकांनी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप करावा - ऊँ ऐं क्लीं श्रीं
मिथुन - मिथुन रास असणारे ज्यांच्या नावाचे पहिले अक्षर (का, की, कु, घ, ड, छ, के, को, हा. हो) याने सुरु होते त्या लोकांचे अनेक प्रेम संबंध असतात. मिथुन राशीचे लोक अति कामुक असतात. धन प्राप्तीसाठी या लोकांनी पुढे दिलेल्या मंत्राचा जप करावा - ऊँ क्लीं ऐं स:
कर्क - या राशीचे लोक फार मूडी स्वभावाचे असतात. कर्क रास असणारे ज्यांच्या नावाचे पहिले अक्षर (ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो) येथून सुरु होते. हे लोक प्रेम प्रकरणाच्या बाबतीत फार मूडी असतात. धन प्राप्तीसाठी या लोकांनी पुढे दिलेल्या मंत्राचा जप करावा -ऊँ क्ली ऐं श्रीं
सिंह - या राशीच्या लोकांच्या हाव-भावावरून त्यांच्या व्यक्तिमत्वाची तसेच भारदस्त आवाजामुळे समोरचा माणूस या लोकांवर खुश होतो. यांचा नुसता आवाज ऐकून मुली प्रभावित होतात. धन प्राप्तीसाठी या लोकांनी पुढे दिलेल्या मंत्राचा जप करावा - ऊँ ह्रीं श्रीं सौं:
कन्या - कन्या रास असणारे ज्यांच्या नावाचे पहिले अक्षर (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो) येथून सुरु होते. या लोकांची गणना महान प्रेमींमध्ये होते. या लोकांना सुख-सुविधा असलेले जीवन अधिक प्रिय असते. या राशीचे लोक आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. धन प्राप्तीसाठी या लोकांनी पुढे दिलेल्या मंत्राचा जप करावा - ऊँ श्रीं ऐं सौं
तूळ - रा, रि, रु, रे, रो, ता, ती, तू, ते या अक्षरांपासून सुरु होणार्या नावाचे लोक तूळ राशीचे असतात. या राशीचे लोक विचारशील असतात. कोणतेही कार्य ते कुशलतेने पूर्ण करतात. धन प्राप्तीसाठी या लोकांनी पुढे दिलेल्या मंत्राचा जप करावा - ऊँ ह्रीं क्लीं श्रीं
वृश्चिक - ज्या लोकांचे नाव तो, ला, नी, नू, ने, नो, या, यी, यू या अक्षरांपासून सुरु होते त्यांची वृश्चिक रास असते. वृश्चिक राशीचे लोक लग्नापूर्वी आदर्श प्रेमी असतात. प्रेमासाठी हे लोक कहीही करू शकतात. हे लोक अहं स्वभावाचे असतात त्यामुळे यांचे अधिक वाद होत असतात. धन प्राप्तीसाठी या लोकांनी पुढे दिलेल्या मंत्राचा जप करावा - ऊँ ऐं क्लीं सौ:
धनु - ज्या लोकांचे नाव ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे अक्षरांपासून सुरु होते त्यांची धनु रास असते. या राशीचे लोक करुणामयी आणि दयाळू असतात. यांच्यातील नेतृत्त्व कौशल्यामुळे मोठी जबाबदारी हे व्यवस्थितपणे पार पाडू शकतात. या लोकांना प्रत्येक क्षण आनंदात घालवावा वाटतो. धनु राशीचे लोक चांगले प्रेमी असतात परंतु त्यांचे प्रेम जास्त काळ टिकत नाही. यांना नेहमी नवीन चेहरे आकर्षित करतात. धन प्राप्तीसाठी या लोकांनी पुढे दिलेल्या मंत्राचा जप करावा - ऊँ ह्रीं क्लीं सौ:
मकर - भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी. या अक्षरांपासून सुरु होणार्या नावाचे लोक मकर राशीचे असतात. मकर राशीच्या लोकांना वाटते की त्यांना कोणाच्याही मदतीची गरज नाही. प्रत्येक कार्य करण्यात ते स्वतः समर्थ आहेत.यामुळे यांचा दुसर्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. हे लोक थोडे जिद्दी स्वभावाचे असतात. धन प्राप्तीसाठी या लोकांनी पुढे दिलेल्या मंत्राचा जप करावा - ऊँ ऐं क्लीं सौ:
कुंभ - ज्या लोकांचे नाव गु, गे, गो, सा, सी, सु, से सो, सा अक्षरांपासून सुरु होते त्यांची कुंभ रास असते. या राशीचे लोक प्रेमळ स्वभावाचे तसेच प्रतिभाशाली असतात. हे लोक भावनिक स्वभावाचे असतात. हे लोक हुशार असतात नवीन एखादी गोष्ट लगेच त्यांच्या लक्षात येते. धन प्राप्तीसाठी या लोकांनी पुढे दिलेल्या मंत्राचा जप करावा - ऊँ ह्रीं क्लीं श्रीं
मीन - दी, दू, थ, झ, दे, दो, चा, ची. या अक्षरांपासून सुरु होणार्या नावाचे लोक मीन राशीचे असतात. या राशीचे लोक शांत स्वभाव असतात. विचारशिल, धार्मिक कार्यात रूचि दाखवित असतात. धन प्राप्तीसाठी या लोकांनी पुढे दिलेल्या मंत्राचा जप करावा - ऊँ ह्रीं क्लीं सौ:
जाणून घ्या... राशीनुसार व्यक्ती आणि त्यांचा स्वभावजाणून घ्या... राशीनुसार व्यक्ती आणि त्यांचा स्वभाव