या मंत्राने प्राप्त / या मंत्राने प्राप्त करा सरस्वती मातेची कृपा

धर्म डेस्क

Aug 12,2011 07:49:16 PM IST

हिंदू धर्मानुसार माता सरस्वतीला ज्ञान आणि बुद्धी तसेच वाणीची देवी मानण्यात आले आहे. अर्थात जे लोक शिक्षण, वाणी किंवा बौद्धीक क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांनी देवी सरस्वतीची उपासना करणे लाभदायक असते. वकील, गायक, कथाकार, शिक्षक आदींनी देवी सरस्वतीची उपासना करावी. सरस्वती देवीच्या उपासनेसाठी अनेक मंत्र, आरती यांची रचना करण्यात आली आहे. परंतु खाली दिलेल्या मंत्राच्या माध्यमातून उपासना केल्यास अधिक लाभ आहे. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
मंत्र
नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे।
वसत्वं मम जिव्हाग्रे सर्वविद्या प्रदाभव।।
सकाळी लवकर उठून स्रान करा. माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करा. पांढरी फुलं अर्पित करा.
प्रतिमेसमोर बसून वरील मंत्राचा यथाशक्ती जप कार. दररोज पाच माळा जप केल्यास उत्तम.

X
COMMENT