Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | purification-of-mind---body---money-is-posible

तन-मन-धनाची शुद्धी करण्याचा सुलभ मार्ग

धर्म डेस्क | Update - Aug 02, 2011, 04:49 PM IST

अतिशय प्रामाणिकपणे आणि पूर्वग्रह न बाळगता दुस-यांमधील चांगल्या गुणांचा शोध घेतला पाहिजे.

  • purification-of-mind---body---money-is-posible

    आपल्या यशापयशाची तुलना इतरांच्या यशापयशाशी करणे चुकीचे नाही. तटस्थ मूल्यमापन केल्याने आपल्यातील अहंकार दूर व्हायला मदत होते. अतिशय प्रामाणिकपणे आणि पूर्वग्रह न बाळगता दुस-यांमधील चांगल्या गुणांचा शोध घेतला पाहिजे. मग विचार करा की हे चांगले गुण माझ्यात कशा रीतीने येतील. काय केले पाहिजे की जेणे करून आपल्यात नसलेले चांगले गुण इतरांपासून आपल्याला शिकता येतील, याचा सतत विचार केला पाहिजे.
    दुस-यांमधील चांगल्या गुणांचे अनुकरण करणे हे भक्तीचे लक्षण आहे. भक्तीमध्ये कथा सत्संगाचेही विशेष महत्त्व आहे. कथा किंवा प्रवचन याविषयी नेहमी एक गोष्ट सांगितली जाते की कथा एकताना देह विस्मृती व्हावी आणि दोषाचे भान यावे. असे झाले नाही तर चांगले गुण आपण आत्मसात करणे शक्यच नाही. ध्यानात असू द्या... जेव्हा आपल्याला शरीराचे विस्मरण होते तेव्हाच आपले आरोग्य चांगले राहते.
    डोके दुखले, पायात मुंग्या आल्या म्हणजेच शरीराची आठवण झाली. शरीराची जेवढी आठवण येईल तेवढे आपण आजारी आहोत असे समजा. शरीर विस्मृती आणि मनाचा अभाव यामुळे आपल्याला आत्म्याची अनुभूती येते. यामुळेच आपल्याला थोडं हलकं वाटू लागतं. चांगल्या गोष्टी स्वीकारण्यात ज्या नैसर्गिक अडचणी असतात त्या दूर होऊ लागतात.
    यासाठी नियमित प्राणायाम आणि ध्यान केल्यास खूपच फायदा होईल. आपल्या वेळेचे नियोजन करताना योग करण्यासाठी आवर्जून वेळ राखून ठेवा. देहशुद्धी स्रानाने होते. धनशुद्धी दानाने होते आणि मन शुद्धी ही ध्यानाने होते.

Trending