Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | rag, anurag and virag

संपत्तीपासून सुख मिळविण्यासाठी... राग, अनुराग व वैराग्य

पं. विजयशंकर मेहता | Update - Aug 20, 2011, 01:24 AM IST

जीवनात अधर्माचा प्रवेश ज्या मार्गांनी होतो त्यापैकी एक मार्ग धनाचाही आहे.

  • rag, anurag and virag

    नदीचे पाणी धरणात अडवून ऊर्जा व सिंचनाची कामे पार पाडली जातात. अगदी तसेच धनाच्या प्रवाहालाही बंधन घालावे लागेल. याचा अर्थ पैशाचा प्रवाह रोखायचा असा नव्हे. शिस्त आणि नियमपूर्वक पैशांचे व्यवहार हेच त्यावरील बंधन आहे. धन आणि नदीची गती सारखीच असते. नदी नष्टचर्य, कष्ट आणि समाधान या तिन्ही गोष्टी देते. धन आपल्या जीवनात येते तेव्हा त्यातून अनेक उत्तरे मिळतात आणि तेवढेच प्रश्नही उभे राहतात. पैशांमुळे प्रत्येक गोष्टीची विभागणी होते.
    त्यामुळे पैशांच्या बाबतीत बाजू घ्यायची असेल तेव्हा ती धर्माची बाजू असावी याबद्दल दक्ष राहा. जीवनात अधर्माचा प्रवेश ज्या मार्गांनी होतो त्यापैकी एक मार्ग धनाचाही आहे. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. पैसा कमावण्यासाठी फारशी बुद्धी लागत नाही, पण त्याची बचत करायला बुद्धी लागते आणि सर्वात जास्त बुद्धी पैसे खर्च करण्यासाठी आवश्यक असते. या तिन्हींचे संतुलन बिघडले तर पैसा विध्वंसक रूप घेतो. आपल्यामध्ये आध्यात्मिक प्रवृत्तीचा उदय होईल, तेवढाच फायदा जग आणि हे जग निर्माण करणा-याच्या बाबतीत घेता येईल. पैसा आपल्याला जगाशी जोडतो, त्याला राग म्हणतात. राग परमात्म्याशी जोडण्यासाठी अनुराग निर्माण व्हावा लागतो आणि परमात्म्याशी जोडले गेलो की वैराग्य निर्माण होते. राग, अनुराग आणि वैराग्य हे तिन्ही धनाचा सदुपयोग शिकवतात. या तिन्हींची नीट ओळख झाली तर संपत्ती भरपूर सुख देईल.

Trending