आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : बहिणीने कशा पद्धतीने भावाला राखी बांधावी ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - नर्सी-नांदेड रस्त्यावर इंडिका कार व ट्रकच्या अपघातात तरुण-तरुणी जागीच ठार झाले. ही घटना कर्‍हाळा शिवारात दुपारी पावणेचार वाजता घडली. कांचन किशनसिंह परिहार (21) व नितीन बाबाराव हणमंते (25) हे दोघेही नांदेडच्या हडको भागात राहतात. ते इंडिका कारने (एमएच 26-इ 4997) नांदेडकडे येत असताना त्यांच्या गाडीची कर्‍हाळा शिवारात नर्सीकडे जाणार्‍या ट्रकशी (एमएच 26- 8900) समोरासमोर जोराची धडक झाली. यात इंडिकामधील कांचन व नितीन जागीच ठार झाले. ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला. कारमध्ये दोघेच असल्यामुळे ते कुठे गेले होते, कुठून येत होते, या दोघांत काय संबंध होते याबाबतची माहिती कोणालाच नाही. कांचन ही इंग्रजी शाळेवर शिक्षिका होती, तर नितीन हा खासगी चालक म्हणून काम करीत होता. ते दोघेही अविवाहित आहेत, अशी माहिती मिळाली आहे. या अपघाताची कुंटूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.