आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rakhi Tomorrow The Method Of Celebrating Raksha Bandhan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या विधीनुसार साजरी करा राखी पौर्णिमा, घरात नांदेल सुख-समृद्धी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला रात्री बारानंतर लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी नसली तरी पारंपरिक वाद्य वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ पारंपरिक वाद्यांचे साहित्य खरेदी करून वाद्य वापरण्याचा सराव करत आहेत.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात पूर्वी पारंपरिक वाद्यांचा वापर केला जात होता. गणेशोत्सवात नित्यनियमाने सकाळ- सायंकाळी गणपतीची आरती करण्यासाठी सनई, चौघडा, ताफा, विणा, तबला, हार्मोनियम (पेटी), टाळ, लेझिम आणि मृदंगाचा वापर केला जात होता. परंतु, सध्या आधुनिक पध्दतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. तसेच आधुनिक पध्दतीचे वाद्य वापरले जात आहे. यात मोठय़ा प्रमाण डॉल्बी, लाऊडस्पीकर, संगीत बॅन्ड आणि मोठय़ा आवाजातील संगीत गाणे वाजवले जात आहेत. मात्र, याचा पर्यावरणावर आणि ध्वणीप्रदूषणावर परिणाम होत आहे. तसेच रात्रीच्या धांगडधिंग्याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत होता. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने गणेशोत्सवात रात्री 10 आणि गणेश विसर्जनाच्या दिवशीही रात्री 12 नंतर वाद्य वापरण्याची बंदी घालण्यात आली आहे. यामुळे गणेश मंडळांना सर्व कार्यक्रम सादर करता येत नाहीत. तशा अनेक गणेश मंडळांनी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन गृहखात्याने गणेश मंडळांना रात्री बारानंतरीही पारंपरिक वाद्य वापरण्यास परवानगी दिली आहे. यासाठी अनेक गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्ये खरेदी करून ते वापरण्याचा सराव सुरू केला आहे. तसेच शहरातील पारंपरिक
वाद्ये वाजवणार्‍यांची मागणी वाढली आहे.
* देशातील पारंपरिक वाद्ये विदेशातील नागरिक आवडीने सण, उत्सवात वापरतात. परंतु, देशात परंपरेने सण, उत्सवात वापरली जाणारी वाद्ये सध्याची तरुण पिढी वापरत नाही. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. तरुणांनी पारंपरिक वाद्ये वापरावित.’’ द्वारकादास आष्टेकर, वाद्यविक्रेता