Home | Jeevan Mantra | Dharm | raksha-bandhan-13-thread-tied-to-the-fixed-bond

रक्षाबंधन 13 ऑगस्टला : भावा-बहिणीच्या प्रेमाची अनोखी परंपरा

धर्म डेस्क | Update - Aug 08, 2011, 03:07 PM IST

श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.

  • raksha-bandhan-13-thread-tied-to-the-fixed-bond

    हिंदू धर्मियांमध्ये रक्षाबंधन सणाचे एक वेगळे महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते. भावाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते आणि भावाला आशीर्वाद देते. भाऊदेखील आयुष्यभर रक्षण करेन असे वचन बहीणीला देतो. भावा-बहिणीतील प्रेमाची ही अनोखी परंपरा आपल्या देशात हजारो वर्षांपासून चालत आली आहे. यंदा रक्षाबंधनाचा सण 13 ऑगस्ट रोजी आहे.
    बहिणी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात तेव्हा त्या मनातून कामना करतात की भावाच्या जीवनात कधी अडचणी, कष्ट येऊ नयेत. भावाचे जीवन सुखमय होवो. भाऊदेखील बहिणीच्या रक्षणाचा संकल्प करतो. सनातन धर्म अर्थात नित्य नूतन धर्म. नित्य नूतन रूपातून प्रकट होणा-या हिंदू धर्मात आता रक्षाबंधनाला नवीन आयाम देण्याचा प्रयत्न देशप्रेमी संस्थांकडून होताना दिसत आहे.
    आज आपल्या देशासमोर अनेक आव्हाने समस्या आ वासून उभ्या आहेत. मनुष्य अधिक स्वार्थी बनत असल्याने समाजातील समस्या, राष्ट्राच्या समस्या आणि धर्मासमोरील आव्हाने याकडे त्याचे लक्ष्य नाही. देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाची जाणीव मना-मनात उत्पन्न करण्यासाठी रक्षाबंधन या सणाला नवा आयाम देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. अनेक राष्ट्रप्रेमी संघटना या निमित्ताने देश आणि धर्माचे रक्षासूत्र बांधून समाजात जागृती आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. सणांना कालसुसंगत आयाम देणे हे सनातन धर्माचे वैशिष्ट्य आहे.

Trending