Home | Jeevan Mantra | Dharm | ramayana and family

रामायणात आहेत कुटुंबव्यवस्था टिकवून ठेवण्याची सूत्रे

दिव्य मराठी | Update - Jul 12, 2011, 01:16 PM IST

जगात सर्वात अधिक वाचली जाणारी, ऐकली जाणारी आणि गायली जाणारी कथा म्हणजे रामायण.

  • ramayana and family

    जगात सर्वात अधिक वाचली जाणारी, ऐकली जाणारी आणि गायली जाणारी कथा म्हणजे रामायण. रामायण केवळ हिंदूंसाठीच उपयुक्त आहे असे नाही तर जगातील समस्त मानवजातीला उपकारक अशी सूत्रे रामायणात विखूरलेली आहेत. रामकथा ही समाज आणि कुटुंबासाठी मार्गदर्शक आहे. आदर्श समाज आणि आदर्श कुटुंबाची बांधणी रामायणातील सिद्धांतांच्या आधारावर झाली तर कुटुंबव्यवस्था कधीच तुटणार नाही. कुटुंबात सुख आणि शांती नांदायची असेल तर रामायणातील घटनांमधून आपल्याला मार्गदर्शन मिळू शकते.
    तुलसीरामायणात एकत्र कुटुंबातील प्रेम आणि वात्सल्याचे अप्रतिम प्रसंग चितारले आहेत. आजही ते प्रसंग तेवढेच प्रासंगिक आहेत. प्रभू रामचंद्रांनी वनात राहूनही आपल्या परिवाराचे रक्षण केले. अयोध्येत जाऊन राज्य, समाज आणि परिवाराचे पालन कर असा उपदेश भरताला केला. रामायणातल्या प्रत्येक प्रसंगात कुठे ना कुठे कुटुंब जोडले आहे. रामायण हा आदर्श कुटुंबाचा ग्रंथ आहे. रामाने आपल्या परिवारासाठी आणि कुटुंबासाठी अनेक त्याग केले. म्हणूनच हिंदू कुटुंबांमध्ये आजही घरात सुख शांती नांदण्यासाठी रामायणाचे पठण करण्यात येते.
    तुलसीरामायणात अयोध्याकांड, किष्किंधा कांड आणि उत्तरकांड हे तीन अध्याय असे आहेत की जे पूर्णपणे कुटुंबावर आधारलेले आहेत. या तिन्ही कथांचा आधार कुटुंबच आहे.

Trending