आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समर्थांची वाणी : मनुष्याने या दोन गोष्टींची काळजी कधीच करू नये...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्याला दोन गोष्टींची काळजी नेहमी लागलेली असते. एक काळजी मृत्युची व दुसरी काळजी संसाराची. मृत्युची काळजी करणे व्यर्थ असते. कारण ज्या पुर्वकर्माने देह जन्मास येतो ते जोपर्यंत भोगायचे असते तोपर्यंत मृत्यू येत नाही. ज्याक्षणी पूर्वकर्म संपते त्याच क्षणी देह कालवश होत असल्याने तेव्हां मृत्यू नको म्हणून चालत नाही. विवेकी माणसाने व्यवहारदृष्ट्या देह सांभाळून वागावे पण अध्यात्मदृष्ट्या मनाने मृत्यूला तोंड देण्यास तयार असावे.
संसाराच्या काळजीची गम्मत अशी आहे की, आपण काळजी केली वा न केली तरी संसार आपल्या मार्गाने बिनबोभाट जात राहतो. भगवंताच्या उपासकाने व्यवहारदृष्ट्या व्यक्तींची, वस्तूंची, व घटनांची उत्तम काळजी घ्यावी पण अध्यात्मदृष्ट्या संसारावर भगवंताची मालकी आहे हे ध्यानात ठेवून कोणाची व कशाची काळजी करू नये. यासाठी श्रीसमर्थ आपल्या श्लोकातून सांगतात की....
देहे रक्षणाकारणें यत्न केला |
परी शेवटीं काळ घेवोनी गेला |
करी रे मना भक्ती राघवाची |
पुढे अंतरी सोडी चिंता भवाची ||
संसार, प्रपंच, देहाला सांभाळून ठेवण्याचा माणसाने कितीही प्रयत्न केला तरी अखेर मृत्यू त्याला घेऊन जातोच. तेव्हां मना, भगवंताची भक्ती करावी. भक्ती करू लागल्यावर मग आत असणारी प्रपंचाची काळजी तू सोडून दे.
समर्थांची वाणी : जाणून घ्या मनुष्याच्या जीवनाचा क्रम कसा आहे ?
समर्थांची वाणी : या जगात कोणती वासना ठेवावी ?
समर्थांची वाणी : जीवनात स्वार्थ असावा पण...
समर्थांची वाणी : रावणाचे साम्राज्य का बुडाले ?
समर्थांची वाणी : मुक्ती प्राप्त करण्यासाठी हे करा...
(साभार : सार्थ मनाचे श्लोक या पुस्तकातून)