आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समर्थांची वाणी : भविष्यातील भीती घालवण्यासाठी कोणाचा आधार घ्यावा?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यक्ती मानवसमाज आणि मानवीजीवन अनेकांगांनी अपूर्ण असल्यामुळे सामान्य माणसाला आयुष्यात पुढे काय घडणार आहे याबद्दल साहजिकच काळजी वाटते. या काळजीचे वसतिस्थान अर्थात मनातच असते. आपल्या मनाने ठरवून काळजी सोडून द्यावी आही आलेल्या प्रसंगांना धैर्याने सामोरे जावे.
पण सामान्य माणसाचे मन इतके विवेकी आणि निश्चयी नसते. त्यास निर्भय होण्यासाठी कोणाचा तरी आधार लागतो. तो आधार भगवंताचा धरावा असे श्रीसमर्थ सांगतात.
भगवंताहून इतर कोणताही आधार तुम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढू शकत नाही. भगवंताचा आधार स्वयंपूर्ण आहे. भगवंताचा आधार असल्यास इतर आधाराची गरज लागत नाही. जो भगवंताला आपला मालक मानतो त्याच्या रक्षणाची जबाबदारी स्वतः भगवंत उचलतो. इतकेच नव्हे तर त्याच्यावर यमराज जरी रागावला तरी भगवंत त्याला सांभाळून घेतो. त्यामुळे श्रीसमर्थ भगवंताला शरण जाण्यास सांगतात...
भवाच्या भयें काय भीतोस लंडी |
धरी रे मना धीर धाकासि सांडी |
रघूनायकासारिखा स्वामी शीरीं |
नुपेक्षी कडा कोपल्या दंडधारी ||
मना ! एखाद्या नामर्दाप्रमाणे प्रपंचाच्या भयाने येवढा घाबरतोस का? जरा धीर धर, धास्ती सोडून दे. भगवंतासारखा मालक तुझे रक्षण करणारा आहे. स्वतः यमराज जरी तुझ्यावर रागावला तरी भगवंत तुझी उपेक्षा करणार नाही.
समर्थांची वाणी : मन स्थिर असेल तरच परमार्थ घडेल
समर्थांची वाणी : या जगात कोणती वासना ठेवावी ?
समर्थांची वाणी : जीवनात स्वार्थ असावा पण...
समर्थांची वाणी : रावणाचे साम्राज्य का बुडाले ?(साभार : सार्थ मनाचे श्लोक या पुस्तकातून)