आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाते निभावण्याची जबाबदारी फक्त तुमची आहे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी गाडी चालवत आहे. माझ्यासमोर असलेला ट्रॅक्टर पुढे जायला रस्ता देत नव्हता. ट्रॅक्टर जरा डावीकडे होऊन मला पुढे निघून जाऊ देऊ शकला असता, पण तो असे करत नव्हता. ट्रॅक्टरमुळे मला उशीर होत होता. आता ही माझी चूक नसून ट्रॅक्टरवाल्याची चूक आहे म्हणून काही मी त्याला टक्कर देत पुढे निघून जाणे योग्य आहे का? मी असे केले नाही. माहिती आहे का? येथे चूक कुणाची हा प्रश्न नाही तर हा कुणाच्या तरी जीवनाचा प्रश्न आहे. त्यामुळेच मी रस्ता मोकळा होईपर्यंत ट्रॅक्टरच्या मागे असहायपणे चालत राहिलो.
समजा मी रस्त्यावर योग्य बाजूने गाडी चालवत आहे. परंतु पाण्याचा एक टँकर राँग साइडने आला. त्याने चुकीच्या बाजूने यायला नको होते. ही टँकरवाल्याची चूक आहे, माझी नाही. म्हणून काय मी त्या लॉरीवर माझी गाडी चढवायची का? मी असे करणार नाही. का, माहिती आहे? प्रश्न चूक कुणाची हा नाही तर तो कुणाच्या तरी जीवनाचा आहे. त्यामुळेच रस्त्याच्या बाजूला होऊन मी टँकरला पुढे निघून जाऊ देईन.
तुम्ही म्हणाल की, मी दुसर्‍यांच्या चुका किती दिवस सहन करत राहणार आहे? याउलट मीच तुम्हाला विचारू इच्छितो की, तुमच्या रस्त्यात असा टँकर आला तर तुम्ही काय कराल? सलग 17 टँकर चुकीच्या दिशेने आले तर काय कराल? रस्त्याचे नियम खूप सरळ आहेत. रस्त्यावर चूक कुणाची होती हा प्रश्नच नसतो. प्रश्न जीवनाचा आहे. जिवंत राहण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारच्या तडजोडी कराव्या लागतात. ‘कुणालाही धडक न मारणे’ आणि ‘स्वत:ला सुरक्षित ठेवणे’ या दोन्ही जबाबदार्‍या फक्त तुमच्या आहेत. रस्त्यावर कुण्या दुसर्‍याच्या चुका दाखवण्यात काहीही फायदा नाही. सगळी जबाबदारी स्वत: तुम्हालाच पत्करावी लागेल.
जे रस्त्यावर होते तसेच नातेसंबंधांमध्येही घडते. अशा वेळी चूक कुणाची आहे, हा प्रश्न नसतो तर कुणाच्या तरी जीवनाचा प्रश्न असतो. नातेसंबंधांमध्ये जेव्हा कटुता निर्माण होते, त्याचा विपरीत परिणाम तुमच्या सुख-समाधानावरही होतोच. सुख-समाधान नसेल ते जीवन कसले? त्यामुळे नातेसंबंधात दुसर्‍याचे दोष काढण्याला अर्थ नसतो.
एखादे चित्र सुंदर काढणे ही चित्रकाराची जबाबदारी आहे. एखाद्या मूर्तीमध्ये जिवंतपणा आणणे ही मूर्तिकाराची जबाबदारी आहे. तद्वतच नाते निभावून नेण्याची जबाबदारीही सर्वथा तुमचीच आहे.
आपण रस्त्याला जीवन आणि रस्त्यावरील रहदारीला नाते मानले तर त्यात चूक कुणाची हा प्रश्नच उद्भवत नाही, तर प्रश्न उरतो तो जीवन कुणाचे आहे.. हे तुमचेच जीवन आहे. मित्रांनो, केवळ तुमचेच!
महात्रया रा
डिव्हायनर ऑफ द पाथ इन्फिनिथिझम, चेन्नई.
mahatria@infinitheism.com