Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | rudraksha importance

हा रुद्राक्ष धारण केल्याने होईल लवकर प्रमोशन

धर्म डेस्क | Update - Jul 24, 2011, 05:26 PM IST

रुद्राक्षाचा उपयोग भारतात प्राचीन काळापासून सुरू आहे.

  • rudraksha importance

    रुद्राक्ष म्हणजे मनुष्याला मिळालेली एक अदभूत देणगीच आहे. रुद्राक्षाचा उपयोग भारतात प्राचीन काळापासून सुरू आहे. रुद्राक्षावर ज्या उभ्या रेघा दिसतात त्यांना रुद्राक्षाचे मुख म्हटले जाते. बहुतेक सर्व रुद्राक्षांवर या रेघा स्पष्टपणे दिसून येतात. कधी कधी वरच्या रेघांमुळे गणपतीसारखी आकृती तयार झालेली असते अशा रुद्राक्षांना भगवान श्रीगणेशाचे प्रतीक मानले जाते.
    हे रुद्राक्ष खूपच चमत्कारी असतात. गणेश धन आणि बुद्धीची देवता आहे. धन, समृद्धी, कार्यकुशलता आणि यशस्वी होण्यासाठी भगवान श्रीगणेशाची आराधना केली जाते. ज्यांना करियरमध्ये अडचणी येत आहेत, त्या लोकांनी गणेश रुद्राक्ष धारण करणे शुभ असते. स्मरणशक्ती वाढ, प्रमोशन आणि व्यावसायिक यश यासाठी गणेश रुद्राक्ष धारण करतात.
    या रुद्राक्षातून तार घालून दोन्ही बाजूस चांदीचे आवरण लावून गळ्यात धारण केल्याने जीवनात यश, कीर्ती आणि प्रमोशन मिळण्यातील अडथळे दूर होतात.

Trending