Home | Jeevan Mantra | Dharm | sadness to happiness and hanumanji

हनुमानजी सांगतात... दु:खातही आहेत सुखी आणि यशस्वी होण्याची सूत्रे

दिव्य मराठी | Update - Jul 12, 2011, 01:27 PM IST

सामान्य माणूस विचार करतो की जीवनात दु:ख नसेल तरच जीवन सुखी आणि यशस्वी होते.

 • sadness to happiness and hanumanji

  सुख आणि दु:खाच्या मार्गानेच मानवी जीवनाची वाटचाल होते. हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी गुण, योग्यता, विचार आणि शक्तीची आवश्यकता असते. परंतु सामान्य माणूस विचार करतो की जीवनात दु:ख नसेल तरच जीवन सुखी आणि यशस्वी होते. यामुळेच मनुष्य सदैव आपले जीवन सुखी आणि निश्चिंत बनविण्यासाठी धडपडत असतो. परंतु सुरक्षित आणि सुखी होण्याची आतुरता यामुळे अनेकदा त्याला आनंद मिळण्याऐवजी चिंता करीत बसावे लागते.
  धर्मशास्त्रामध्ये अशा दु:ख आणि चिंता यापासून मुक्त अशा जीवनासाठीचे काही सूत्र सांगण्यात आले आहेत. ही सूत्रे वरवर पाहाता अव्यवहारिक वाटू शकतात. परंतु या सूत्रांतील गहन आणि शाश्वत अर्थ समजून घेतला की जीवनात संतुलनही येते आणि अडचणीतून मार्ग काढण्याची शक्तीही.
  अशा वेळी संकटमोचक देवता आणि संयमाचा महान आदर्श श्री हनुमान यांनी सांगितलेली सूत्रे मार्गदर्शक ठरतात. दु:खाला वाईट न मानता दुख हे चांगल्यासाठीच आहे असे मानून त्याचा सामना करा, असे वीर हनुमंतांनी सांगितल्याचा उल्लेख रामचरितमानसमध्ये येतो.
  कह हनुमंत बिपत्ति प्रभु सोई । जब तब सुमिरन भजन न होई॥
  या चौपाईमध्ये देवस्मरण, भक्ती आणि समर्पण यांच्या आधारे जीवन सुखी करण्याचा संदेश देण्यात आला आहे. मनुष्य दुखाला संकट मानतो परंतु दुख श्रेष्ठ आहे. कारण अशा वेळीच आपल्याला भगवंताची आठवण होते. याउलट वाईट वेळ तर तेव्हा असते जेव्हा आपल्याला ईश्वराचे विस्मरण होते. देवाची आठवण राहात नाही.
  व्यवहाराच्या भाषेत सांगायचे तर वाईट वेळ ही आपल्याला सोन्याप्रमाणे तावून सुलाखून काढते. त्यामुळे अशा वेळी निराश न होता ईश्वरावर आणि स्वतावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. केवळ दुखातच नाही तर सुखातही ईश्वराचे स्मरण ठेवून वागा. वीर हनुमान यांनी सांगितलेले हे सूत्र पाळलेले तर पर्वताएवढे दुख वाट्याला आले तरी मनुष्य गडबडून जात नाही. मनशांती घालवून बसत नाही. हेच जीवनाचे सार नाही काय ?

Trending