साई बाबांची भक्ती करताना ध्यानात ठेवा या 3 गोष्टी
हिंदू धर्म मान्यतांनुसार साई बाबांना महायोगी भगवान दत्तात्रय यांचा अवतार मानण्यात येते.
-
साई बाबांना जगदगुरू म्हटले जाते. हिंदू धर्म मान्यतांनुसार साई बाबांना महायोगी भगवान दत्तात्रय यांचा अवतार मानण्यात येते. दत्तात्रय भक्तीप्रमाणेच साई भक्ती आणि नामस्मरणामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात. मनोकामना पूर्ण होते. गुरूवारी साई बाबा यांची पूजा आणि स्मरण करणे शुभ असते. साईबाबांचे स्मरण कोणत्याही रुपात केले तरी ते शुभ आणि मंगलकारी आहे. परंतु असे असले तरी प्रत्येक साईभक्तांने बाबांनी सांगितलेल्या तीन गोष्टी सदैव स्मरणात ठेवले पाहिजे. त्या तीन गोष्टी म्हणजे...
1. श्रद्धा. साईबाबांचे हे सूत्र केवळ धार्मिक अर्थानेच नाही तर व्यावहारिक अर्थानेही महत्त्वाचे आहे. जीवनात तुम्ही कोणतेही काम करताना श्रद्धेने आणि समर्पित वृत्तीने करा. त्या कार्याप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा आणि त्यागची भावना ठेवा.
2. सबूरी. जीवनात सुखी होण्यासाठीचा श्रेष्ठ उपाय आहे सबूरी. संतोष, धैर्य आणि संयम या गुणांमुळे जीवनात स्थायी आनंदाची प्राप्ती होते. असंतोष किंवा असंयम, कलह, संताप यामुळे जीवन सुखी होणे शक्यच नाही.
3. एकता. साई बाबांनी सांगितलेल्या या सूत्रानुसार मानवता म्हणजेच धर्म होय. सर्वात महान धर्म म्हणजे मानवता. ईश्वर हा अनेक रुपांतून व्यक्त होतो, हा हिंदू धर्मातील मूलभूत सिद्धांत साई बाबांनी आणखी सोप्या भाषेत या जगाला सांगितला आहे. माझाच धर्म खरा या संकुचित विचारापासून दूर राहिले पाहिजे. इतर धर्मांचाही आदर केला पाहिजे. विश्वास, प्रेम, परोपकार, दया, त्याग ही मूल्ये जपली पाहिजेत. यातच धर्म आहे. सबका मालिक एक या मंत्राने साईबाबांनी सगळ्यांना एक केले.
More From Jeevan mantra News
- पुराणामध्ये वर्णित आहे, कोणत्या 4 प्रकारच्या मुलींशी चुकूनही करू नये लग्न
- साधू दरबारात पोहचताच राजा त्यांना म्हणाला, 'महाराज आमच्या राजकुमाराची किंमत सांगू शकाल', साधूने किती लावली असेल राजकुमाराची किंमत?
- प्रेरणादायी गोष्ट : वैद्य लुकमान यांनी आपल्या मुलाला शिकवण देण्यासाठी धुपदान, चंदन कोळसा आणण्यासाठी सांगितले..त्यानंतर जे घडले ते पाहून मुलगाही गोंधळला...