Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | sawan this measure will succeed in everything

श्रावणात हा उपाय केल्याने कामात मिळेल यश

धर्म डेस्क. उज्जैन | Update - Jul 19, 2011, 01:20 PM IST

जीवनात स्थिरता येण्यासाठी श्रावणात केले गेलेले उपाय अधिक प्रभावशाली असतात कारण तंत्र विद्येचा देवता महादेव आहे.

 • sawan this measure will succeed in everything

  जीवनात स्थिरता येण्यासाठी श्रावणात केले गेलेले उपाय अधिक प्रभावशाली असतात कारण तंत्र विद्येचा देवता महादेव आहे. आणि श्रावण महिना महादेवाला प्रिय आहे.
  जर तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी होत नाही किंवा विशेष कामासाठी बाहेर जात आहात व ते काम सफल व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर, श्रावण महिन्यात तुम्ही खाली दिलेला उपाय करा आणि कामांमध्ये यश प्राप्त करा.
  उपाय

  हा उपाय श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या सोमवारी करा.
  महादेवाच्या मंदिरात जाऊन दुधाने महादेवाला अभिषेक करा.
  मनातल्या मनात ऊँ नम: शिवाय जप करत आपण ज्या कामासाठी बाहेर जाणार आहात ते काम पूर्ण व्हावे अशी प्रार्थना करा. लक्षात ठेवा की, दुधाची धार तोपर्यंत बंद झाली नाही पाहिजे जोपर्यंत प्रार्थना पूर्ण होत नाही.
  नंतर चंदनाने शिवलिंगाची पूजा करा, पेढा, बेदाणा, पाच बत्ताशे आणि लवंगाची जोड असा प्रसाद ठेवावा. हात जोडून नमस्कार करा. तुम्हाला तुमचा कामात सफलता मिळेल.

Trending