आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुत्ररत्न प्राप्तीसाठी आज करा शनी प्रदोष व्रत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथानुसार प्रदोष व्रत केल्याने सर्व सुख प्राप्त होतात. हे व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला केले जाते. विभिन्न दिवशी हे व्रत विभिन्न योग तयार करते. जेव्हा त्रयोदशी शनिवारी येते तेंव्हा शनी प्रदोष व्रत केले जाते. या महिन्यात हे व्रत २ जून म्हणजे आज शनिवारी आहे. पुराणानुसार शनी प्रदोष व्रत केल्याने पुत्र प्राप्ती होते. शनी प्रदोष व्रताचे पालन शास्त्रोक्त पद्धतीने करावे. विद्वान ब्राम्हणाच्या हाताने हे व्रत करावे.
- प्रदोष व्रत पाणी न पिता केले पाहिजे. सकाळी स्नान केल्यानंतर महादेव, पार्वती, नंदी यांना पंचामृत व गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा. बेलाचे पान, अक्षता, धूप, दीप, पुष्प, पान, सुपारी, फळ, लवंग, विलायची देवाला अर्पण करा.
- संध्याकाळी परत एकदा वरील प्रमाणे महादेवाची पूजा करा. महादेवाची षोडशोपचार पूजा करा, ज्यामध्ये महादेवाची सोळा सामग्रीने पूजा करा.
- महादेवाला शुद्ध तूप आणि साखर, गहू मिश्रित नैवैद्य दाखवा.
- आड दिवे आठ दिशेला लावा. प्रत्येक दिशेला दिवा ठेवतांना दिव्याला नमस्कार करा. महादेवाची आरती करा. शिव स्तोत्र, महादेवाचा जप करा.
- रात्री जागरण करा.
जाणून घ्या, तुमच्या पत्रिकेत शनि दोष आहे काय?
कुंभ राशीत शनि असेल तर घाबरू नका, तो शुभ संकेत आहे.