आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संस्काराचा पाया भक्कम करणारा श्रावणी उत्सव आज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक कर्माच्या वेळी प्रत्यक्ष सान्निध्याने आचार, विचार आणि आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एखाद्या प्रतीकाची आवश्यकता असते. त्याशिवाय धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ साधता येत नाहीत .संस्काराचा पाया घडवणारा श्रावणी उत्सव आज आहे. श्रावणी पौर्णिमेस सर्व ब्रह्मवृंद उपनयन संस्कारानंतर यज्ञोपवीत (जानवे) धारण करतात. ब्राह्मणांचे काही गुण दया, क्षमा, शांती, त्याग आदी सांगितले गेले आहेत.
हिंदू धर्मात, परंपरेत, विचार प्रणालीमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतीक म्हणून यज्ञोपवीत धारण करणे आवश्यक आहे. त्यामुळे यज्ञोपवीत हे प्रतीकच आहे.
यज्ञोपवीत धारण करताना वेद नामोच्चारपूर्वक तयार केलेले पंचबद्धग्रंथीचे अखंड असे पावित्र्य निदर्शक सूत्र आहे. परमेश्वरावर निष्ठा ठेवून यज्ञोपवीत धारण करण्यासाठीच खालीली विधी सांगितला आहे.
विधी
शुद्ध जलात भिजवून ठेवलेल्या यज्ञोपवीतास दहा वेळा गायत्री मंत्राने अभिमंत्रित करावे. हे यज्ञोपवीत ज्ञानोत्पादक सूर्यदेवाचे आवाहन करून धारण करावे.
तेजाच्या देवतेची उपासना
- यज्ञोपवीत हे पवित्र असून ब्रह्मदेवाबरोबर उत्पन्न झालेले आहे. आपल्या ठायी कीर्तियुक्त आयुष्य, बल, तेज स्थापन व्हावे यासाठी यज्ञोपवीत धारण करावे.
- जुने यज्ञोपवीत विसर्जन करून गायत्री मंत्राचा 108 जप करावा. या जपाने ‘सूर्यनारायण भगवान ’ संतुष्ट होतात.
- भगवंताची कृपा- आशीर्वादासाठी श्रावणी ( यज्ञोपवीत विधी ) सांगितला आहे. - यज्ञोपवीत म्हणजे सत्त्व, रज आणि तम या त्रिसूत्रांनी ब्रह्मग्रंथीत एकवटलेले जानवे होय. तीन अवस्थांचे तेच प्रतीक असल्याचे मानले जाते.