मंदिरात प्रवेश करताना / मंदिरात प्रवेश करताना सुरुवातीला करावे श्री गणेश वंदन!

धर्मडेस्क. उज्जैन

Jul 23,2011 11:47:02 AM IST

मंदिरात प्रवेश करतानाच आपल्याला मन:शांती लाभते. परमेश्वराच्या कृपाप्रसादाने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. सुख- दु:खात आपण परमेश्वराची आराधना करतो. त्याचे दर्शन घेण्यासाठी आपण मंदिरात जातो. मंदिरात गेल्यानंतर सुरुवातीला काय केले पाहिजे, हे आपल्याला माहित नसते. याबाबत वेद-पुराणात महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. मंदिरात प्रवेश करताना आपण दोन्ही हात जोडूनच प्रवेश करावा. मंदिरात प्रवेश करताना सुरुवातीला गणेश वंदन केले पाहिजे, कारण श्री गणेश पूजन प्रथम पुजनीय मानले जाते. वेद-पुराणातील अनेक कथांमध्ये असा उल्लेख आला आहे. शिव शंकराने श्री.गणेशाला प्रथम पुज्य असल्याचे वरदान दिले आहे.
त्यामुळे आपल्या घरात कोणतेही धार्मिक कार्य करण्यापूर्वी सुरुवातीला गणेश पूजन केले जाते. विशेष म्हणजे प्रत्येक मंदिरात प्रवेशद्वारावरच श्री. गणेश मूर्ती असते. मंदिरात प्रवेश करताना श्री गणेश वंदन केल्यानंतरच मंदिरात प्रवेश करावा. आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व देवी-देवतांची आपल्यावर कृपादृष्टी असते.X
COMMENT