लहान मुलांना सूर्यदर्शन / लहान मुलांना सूर्यदर्शन करविण्यामागचे शास्त्र काय ?

Aug 22,2011 07:07:52 PM IST

बाळाचा जन्म झाल्यापासून आपल्या संस्कृतीत अनेक संस्कार सांगण्यात आले आहेत. निष्क्रमण संस्कार हे त्यातलेच एक. या संस्कारांतर्गत सूर्य आणि चंद्र दर्शन करण्याची प्रथा आहे. निष्क्रमण याचा अर्थ आहे बाहेर काढणे. आजपर्यंत बाळ चार भिंतीच्या आत घरच्या सुरक्षित वातावरणात होते. परंतु आता बाळाला चार भिंतीच्या बाहेर यायचे आहे. शरीर आणि मनाच्या विकासासाठी बाळाला सूर्याच्या प्रकाशाची आणि थंड हवेची आवश्यकता असते. सूर्यप्रकाश आणि थंड हवेइतकी गरज अन्य क्वचितच एखाद्या गोष्टीची असेल. त्यामुळेच निष्क्रमण संस्काराला विशेष महत्त्व आहे.
समान्य भाषेत या संस्काराला सूर्यपूजन म्हणता येईल. आपल्या देशातील जवळपास सर्वच प्रांतात मुलांवर निष्क्रमण संस्कार करतात. या संस्काराला नावे वेगवेगळी असतील, विधींमध्ये थोडी भिन्नता असेल मात्र मूळ तत्त्व एकच असते. सूर्य आणि चंद्रपूजा अवश्य केली जाते. वैदिक मान्यता आहे की संपूर्ण विश्वाचे संचालन दोन तत्त्वांनी होते... एक उष्णता आणि दुसरे तत्त्व शीतलता. बाळ सूर्यासारखे गतीशील व्हावे यासाठी सूर्यदर्शन करवितात. चंद्र हा मनाचा स्वामी आहे. मनोविकारांपासून दूर ठेव अशी प्रार्थना चंद्रपूजेमागे आहे.

X