...तर प्रत्येक कामाचे / ...तर प्रत्येक कामाचे फळ आपल्याला अनुकूल असेच मिळेल

Aug 01,2011 03:11:06 PM IST

तुम्ही कोणतेही काम कराल तेव्हा त्या कामाचे मूल्यमापन करा. या कामाच्या मागे आपले शरीर किती, बुद्धी किती आणि हृदय किती प्रमाणात आहे याचा विचार करा. या तिन्ही गोष्टींवरूनच त्या कामाचा आपल्याला मिळणारा आनंद ठरत असतो.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर म्हणतात, कार्याच्या फळाचीच आपल्याला अधिक चिंता असेल तर आनंद कसे मिळणार ? आपल्या आत आत्मविश्वास जागवा की माझ्या कामाचे फळ कल्याणकारीच असणार आहे.
कार्याचे फळ चांगले असेल की वाईट असा विचार विसरून जा. असे केल्याने आपण कर्मबंधनातून मुक्त होऊ. परिणामांची चिंता करणे हा एक प्रकारचा आजारच आहे. खासकरून विद्यार्थी परिक्षेचा निकाल जवळ येताच चिंतीत होतात. निकालाच्या भीतीने काही मुलं आत्महत्या करतात.
परिणामांबद्दल किंवा फळाबद्दल अत्याधिक चिंता आणि भीती यापासून मुक्त होण्यासाठी आपण पुढील उपाय करू शकतो. आवडीच्या कामात व्यस्त राहा. संगीत ऐका. काहीच काम करावं वाटलं नाही तर झोपून जा. आंघोळ केल्यानेही अशा चिंतेतून मुक्ती मिळते. परिणामांची भीती वाटू लागेल तेव्हा एक सवय करा की जे काम करीत आहात त्यातच बुडून जा. यामुळे आपली सृजन शक्ती वाढेल. परिणामांची चिंता विस्मरणात जाईल. जीवनाकडे खेळाप्रमाणे पाहा, युद्धाप्रमाणे नको. यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर चिंतन करा.

X