काही देवतांसमोर तेलाचा / काही देवतांसमोर तेलाचा तर काहींसमोर तुपाचा दिवा का लावला जातो ?

Aug 08,2011 04:20:47 PM IST

शास्त्रांच्या अनुसार सृष्टी संचालित करणा-या देवी देवतांना तीन भागात विभागले गेले आहे. सात्विक, राजसिक आणि तामसिक गुणांच्या आधारे ही विभागणी करण्यात आली आहे. या तीन्ही शक्ती सृष्टीतल्या जीवांचे पालन पोषण आपापल्या गुणांनुसार करतात. हिंदू धर्मानुसार पूजेच्या वेळी दिवा लावण्याची परंपरा आहे. परंतु काही देवतांच्या समोर तेलाचा दिवा लावला जातो तर काहींच्या समोर मात्र तुपाचा दिवा लावला जातो. यामुळे देवतांची कृपा प्राप्त होते अशी धारणा आहे. परंतु असे का, याची माहिती क्वचितच सर्वसामान्य लोकांना असते.
तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावण्यामागेसुद्धा तीन गुणांचा विचार आहे. काही देवता तामसिक गुणप्रधान असतात तर काही राजसिक आणि सात्विक गुणप्रधान. ज्या देवता तामसिक गुणप्रधान असतात त्या देवतांसमोर तेलाचा दिवा लावला जातो. कारण तेल तामसिक गुणकारक आहे. ज्या देवी देवता राजसिक किंवा सात्विक गुणप्रधान असतात त्या देवतांच्या समोर तुपाचा दिवा लावला जातो. कारण तुप सात्विक आणि राजसिक गुणकारक आहे.

X