Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | speak less and think more

अधिक बोलण्याने शारीरिक नुकसानच होत नाही तर...

धर्म डेस्क | Update - Sep 08, 2011, 04:34 PM IST

बुद्ध, महावीर, कबीर, तुलसी या सर्वांनी तेच सांगितले आहे, जे वेद आणि पुराणात ऋषी-मुनींनी सांगितलेले आहे.

  • speak less and think more

    कधीही जुने शास्त्र, विचार, सिद्धांतावर चर्चा करायची असेल तर नवीन शब्दप्रयोग होणे आवश्यक आहे. भावार्थ तोच असावा. जो हजारो वर्षांपूर्वी होता तो. जसे की रुपये - पैसे कुजतात तसेच शब्दही खराब होतात. शब्दांना ताजेतवाने ठेवण्यासाठी मोजकेच बोला. अधिक बोलण्याने केवळ शारीरिक नुकसानच होत नाही तर शब्दांच्या ताकदीची तीव्रता कमी होते. जास्त बोलण्याचा परिणाम घसा आणि फुप्फुसावरही होऊ शकतो, एकूणच ते शरीरास अपायकारक आहे. जास्त बोलणाराला हे माहीत नसते की आपली भाषा कधी वायफळ झाली. समाजात आदर, मोठेपणा आणि स्वत:ची गंभीरताही निघून जाते. कोणतेही काम करण्यापूर्वी आपण एक योजना आखत असतो, त्याचप्रमाणे बोलण्याआधी शब्दप्रयोगाची योजना आखायला हवी. जितके मोजके शब्द वापराल तितकी भाषा चांगली वाटेल. सभ्यता चांगल्या भाषेचे लक्षण आहे. जास्त, घाईत बोलणे विचाराची गती कमी करीत असते आणि हुशार लोक कमी, मोजकेच बोलतात. त्यासाठी 24 तासातून मौन पाळा. बुद्ध, महावीर, कबीर, तुलसी या सर्वांनी तेच सांगितले आहे, जे वेद आणि पुराणात ऋषी-मुनींनी सांगितलेले आहे. परंतु मूल्यांची गोष्ट करतेवेळी यातील प्रत्येकाचे शब्द नवीन, वेगळे आणि अभिमानास्पद राहिले आहेत. आपणही असे करू शकतो. यासाठी शब्द वाचवा आणि त्या राहिलेल्या शब्दांमध्येच प्रत्येक विचाराला नव्या रूपामध्ये ताजे बनवा.

Trending