आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक गोष्टीमध्ये अध्यात्म व भक्तीचा समावेश असावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुदाम्याच्या पत्नीने हात जोडून लाख विनंत्या केल्यानंतर सुदाम्याने श्री कृष्ण भेटीला जाण्याविषयी विचार केला. धन, संपत्तीचा तर लोभ आपल्याला नाही. मात्र एक वेळेस भगवान श्री कृष्णाचे दर्शन झाले म्हणजे खूप काही मिळाल्यासारखेच आहे. असा विचार करून सुदामा श्री कृष्णाच्या भेटीसाठी निघाला.
श्रेष्ठ व ज्ञानी पुरुषाचे असे वैशिष्ठ असते की, तो प्रत्येक गोष्टीमध्ये अध्यात्म व भक्तीचा समावेश करत असतो. सुदाम्याची पत्नी मुलांच्या भुकेमुळे चिंतित, त्रस्त होती. तुम्ही श्री कृष्णाच्या भेटीला जाऊन मुलांसाठी काहीतरी खाण्यास घेऊन यावे, अशी विनंती सुदाम्याला करत होती. मात्र तेथे गेल्याने किमान भगवान श्री कृष्णाचे दर्शन होईल, एवढेच सुदामा महत्त्वाचे मानत होता.
आपल्या मनात जेव्हा सुदाम्यासारख्या दिव्य गोष्टी येतात तेव्हा परमात्म्याकडे काहीच मागण्याची गरज राहत नाही. काही न मागताच भांडार भरून जाते. हाच विचार करून सुदाम्याने श्री कृष्णाकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. जाताना तो पत्नीला म्हणाला, आपल्या घरात काही भेट देण्यायोग्य वस्तू आहे काय? असेल तर ती श्री कृष्णाला देण्यासाठी माझ्याकडे देऊन टाक. तेव्हा त्याची पत्नी बाजूच्या ब्राह्मणांच्या घरी गेली आणि त्यांच्याकडून मूठभर तांदूळ घेऊन आली. एका कापडात हे तांदूळ बांधून तिने पती सुदाम्याकडे कृष्णाला भेट देण्यासाठी दिले. हे पोहे घेऊन तो द्वारकेच्या मार्गाने निघून जातो. द्वारकेला येत असताना श्री कृष्णाचे दर्शन आपल्याला कसे प्राप्त होईल हाच विचार तो करत असतो. जीवनामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपण ज्यांची कृपा, आशीर्वाद मिळविण्यासाठी जात असतो, त्यांच्याकडे कधी रिकाम्या हाताने जायचे नसते. श्री कृष्णाला काहीच कमी नव्हते. अशा वेळी सुदाम्याच्या मूठभर तांदळाने त्यांना काय मिळणार होते. मात्र येथे प्रश्न वस्तूंच्या मूल्याचा नाही तर मनातील भावनेचा आहे. विद्वान व संतांच्या मते राजा, ब्राह्मण, गुरू आणि लहान मुलांजवळ जाताना कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये. लहानशी का होईना एखादी भेटवस्तू आपण घेऊन गेले पाहिजे. असे केले असता ते प्रसन्न होत असतात.