वाहत्या नदीत नाणे / वाहत्या नदीत नाणे टाकण्याची परंपरा का आहे ?

Aug 18,2011 02:51:44 PM IST

भारतात अनेक परंपरा अशा आहेत की, काही लोक त्या परंपरा पाळतात किंवा काही अंधश्रद्धा म्हणून सोडून देतात. अशीच एक परंपरा आहे नदीत पैश्याचे नाणे टाकण्याची. बरेच लोक प्रवास करताना जर एखादी नदी दिसली की त्यामध्ये नाणे टाकतात आणि नमन करतात. खर तर ही काही अंधश्रद्धा नाही तर एका उद्देश्यासाठी तयार केली गेलेली परंपरा आहे. याचे पहिले कारण म्हणजे पहिल्या काळात चांदी किंवा तांब्याचे नाणे वापरात होते.
जेव्हा ते नाणे नदीत टाकले जात होते तेंव्हा नदीत एकत्रित झालेले नाणे पाणी शुद्धीकरणाचे कार्य करत होते. त्याचबरोबर त्यामागे एक कारण असे पण आहे की, नदीत नाणे टाकणे म्हणजे दान करणे कारण काही गरीब मुले नदीतील ते नाणे गोळा करतात. त्यामुळे नदीत नाणे टाकले तर दान केल्याचे पुण्य मिळते. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार वाहत्या नदीत चांदीचे नाणे टाकले तर अशुभ चंद्राचा दोष नाहीसा होतो.X