Home | Jeevan Mantra | Dharm | these-5-person-give-lesson-how-to-live

हे 5 प्रकारचे लोक आपल्याला शिकवतात 'कसं जीवन जगायचं'?

धर्म डेस्क | Update - Sep 12, 2011, 08:33 PM IST

जीवनाशी निगडीत तत्त्वज्ञानाबद्दल अज्ञानी राहिल्याने अशी मनस्थिती निर्माण होते.

 • these-5-person-give-lesson-how-to-live

  अडचणींपासून दूर पळत आनंदी आणि सहज जीवन जगण्याकडे सर्वांचाच कल असतो. परंतु ही भावना अधिक तीव्र झाली तर माणूस दररोज, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी, उठता बसता आसपासच्या लोकांविषयी तक्रारी करू लागतो. यामुळे जीवन अशांत बनते व जीवनात ताण-तणाव निर्माण होऊन माणसाला एकटेपणाला सामोरे जावे लागते.
  शास्त्रांनुसार समाजात राहूनही आपण जीवनाशी निगडीत तत्त्वज्ञानाबद्दल अज्ञानी राहिल्याने अशी मनस्थिती निर्माण होते. हिंदू धर्मग्रंथ महाभारतात जीवनाकडे कसे पहावे याविषयी अतिशय महत्त्वाचे सूत्र सांगण्यात आले आहे. या सूत्रानुसार जीवनात 5 प्रकारचे लोक भेटत असतात, हे ध्यानात घेऊन माणसाने परिस्थिती हाताळत जीवन जगावे.
  महाभारतात म्हटले आहे...
  पञ्च त्वानु गमिष्यन्ति यत्र यत्र गमिष्यसि।
  मित्राण्र्यामित्रा मध्यस्था उपजीव्योपजीविन:।।
  या श्लोकाचा अर्थ आहे, जीवनात जेथे कोठेही जाल तेथे पुढील 5 प्रकारच्या लोकांना तोंड द्यावं लागतंच...
  मित्र. समान विचार, व्यवहार आणि भावना असणारे लोक आपले जवळचे मित्र बनून सहकार्य करतात.
  शत्रू. काम, स्वार्थ किंवा हित या मुद्दयावर विरोधी, द्वेष करणारे किंवा ईर्षा भाव ठेवणारे लोक शत्रुत्व ठेवून वागतात.
  उदासीन. असे लोक चांगले होऊ दे की वाईट, तुम्हाला साथ देत नाहीत किंवा विरोधही करीत नाहीत. या लोकांची निष्क्रियता कोणालाही अस्वस्थ करू शकते.
  आश्रयदाते. कठीण प्रसंगांमध्ये निस्वार्थपणे सहकार्य आणि सेवा करणारे लोक.
  आश्रयाला येणारे लोक. वाईट वेळ आल्याने दुर्बल, गरीब किंवा अन्य कारणांमुळे शरण येणारे लोक.
  वरील 5 प्रकारच्या लोकांशी आपली गाठ पडतेच. त्यामुळे वेळ आणि माणसे पाहून जीवनाची योग्य मार्गाने वाटचाल केली पाहिजे. हे सत्य समजून न घेता केवळ दुस-यांना दोष देत, कलह, संताप व्यक्त करत जीवन जगणे कितपत योग्य आहे.

Trending