आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आठ गुण चमकवतात पुरूषांचे नशीब

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्‍या आस-पास अशा अनेक व्‍यक्‍ती आपण पाहतो की, ज्‍यांची योग्‍यता आणि गुणवत्ता असताना देखील त्‍यांना यश मिळत नाही.

व्‍यावहारिकदृष्‍टया याचा विचार केला तर याची अनेक कारणे असू शकतात. यामध्‍ये स्थिती, वेळ, सुविधा आणि प्रयत्‍न यांची भूमिका महत्‍वाची असते. परंतु, धर्माच्‍या नजरेने विशेषत: पुरूषांच्‍या बाबतीत विचार केल्‍यास त्‍याच्‍या प्रगतीत काही खास निर्णायक गुण असतात.

हिंदू धर्मग्रंथ महाभारतात अनेक वीर आणि असामान्‍य पुरूषांबाबत लिहिण्‍यात आले आहे. पुरूषांमध्‍ये असलेले काही खास गुण त्‍यांना विशेष सन्‍मान व उच्‍च पदाचे दावेदार बनवून देणारे ठरतात, असे हिंदू धर्मग्रंथ महाग्रंथात सांगितले आहे.

पुरूषांना या आठ गुणांची आवश्‍यकता असते.

बुद्धी- बुद्धी किंवा अक्‍कल पुरूषाला अडचणीतून बाहेर काढून यशाचा मार्ग दाखवते.

ताकद- जोश आणि उत्‍साह असेल तर कोणतेही लक्ष्‍य भेदण्‍यास ते निर्णायक ठरते.

कुलिनता- पुरूषाचे चांगल्‍या कुळात जन्‍म घेणे आणि त्‍याचे चांगले संस्‍कार, आचरण, कर्म आणि विचार मान वाढवतात.

ज्ञान- पुरूषाचे ज्ञानी किंवा शिक्षित असणे महत्‍वाचे असते. खासकरून शास्‍त्रासंबंधीचे शिक्षण त्‍याच्‍या व्‍यावहारिक समजूतदार पणाची प्रतिष्‍ठा दाखवते.

जास्‍त न बोलणे- वाचाळता किंवा जास्‍त बोलणे चांगले नसते. त्‍यासाठी पुरूषांनी कमी आणि योग्‍य बोलणे त्‍याला सन्‍मान प्राप्‍त करून देते.

दानी- दान करणारा व्‍यक्‍ती दुस-यांचा सन्‍मान आणि प्रेम प्राप्‍त करतो.

उपकार मानणारा- जो व्‍यक्‍ती मदत करणा-यास लक्षात ठेवतो तो पुरूष सगळ्यांकडून सन्‍मान मिळवतो.

वीरता- भय आणि पळपुटेपणास दूर ठेवणा-या पराक्रमी पुरूषाकडे मोठा आत्‍मविश्‍वास असतो. जो जीवनात मार्गक्रमण करताना प्रत्‍येकक्षणी साह्यकारी ठरतो.
या राशीच्‍या व्‍यक्‍ती असतात, सुंदर आणि आकर्षक