आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • These Five Vegetables You Will Eat For Become Healthier

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : या पाच गोष्टींचा आहारात करा वापर, शरीर होईल निरोगी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे म्हणतात की, मनुष्याला जर स्वस्थ आणि निरोगी शरीर हवे असेल तर त्याने पौष्टिक आहार घेतला पाहिजे. संतुलित आहार घेतल्याने आजार जवळ येत नाहीत. परंतु अनेक लोकांना हे माहित नाही की, कोणता आहार जास्त फायदेशीर आहे. तर चला आज आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टींची माहिती देतो. त्या गोष्टींचा जर तुम्ही तुमच्या जेवणात वापर केला तर तुमचे शरीर निरोगी आणि स्वस्थ राहील.
पेरू - हृदयाच्या आजाराला दूर ठेवण्यासाठी, तसेच वारंवार कफ होत असेल तर पेरूचा वापर जेवणात करा. ज्यांना मधुमेह आहे त्यांनीही औषधी म्हणून पेरू खावेत.
हिरवी फुलकोबी - जन्मापासून असलेल्या आजारांना दूर करण्यासाठी फुलकोबी अत्यंत उपयोगी आहे. आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम फुल कोबी करते. त्याचबरोबर हाडे मजबूत करण्यासठी फुलकोबी अत्यंत उपयोगी आहे.
गाजर- गाजरात फॅल्केरिनॉल नावाचा एक फॅटी अल्कोहोल आढळून येत असून तो कॅन्सरची शक्यता कमी करतो. एवढेच नाही तर गाजरामध्ये असलेले बीटा-कॅरोटिनही कॅन्सरच्या विरोधात शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत बनवते. सर्दी-खोकला यासारख्या समस्या नियंत्रित करण्यासाठी गाजराचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये असलेल्या बीटा-कॅरोटिन नावाच्या घटकामुळे पांढर्‍या रक्तपेशी आणि टी सेल्सच्या संख्येत वाढ होते. ही वाढ प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप आवश्यक आहे. गाजरामुळे डोळे निरोगी राहतात. कारण गाजर ‘अ’ जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे. साधारणत: जेवणात ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेच डोळ्यांचा प्रकाश कमकुवत होतो. तुम्हाला गाजरासह भरपूर ‘अ’ जीवनसत्त्व असलेल्या खाद्य पदार्थांचेही सेवन करता येईल.
पत्ताकोबी - शरीरात तयार होणार्या विषारी कणांना रोखण्यात पत्ताकोबी विशेष कार्य करते. पत्ताकोबीत इतर भाज्यांच्या तुलनेत जास्त पौष्टिकता असते.
पालक : जेवणात पालक व इतर पालेभाज्यांचा समावेश करावा. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पालकात भरपूर फोलेट असते. तसेच यामुळे डीएनए आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होत नाही. त्वचा रोग आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या आजारांवरही पालक उपयोगी आहे.