आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Spells Is Very Miraculous Life Will Bring Happiness

खूपच प्रभावशाली आहे हा मंत्र, आयुष्यात येईल सुख-समृद्धी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्रामध्ये खूप शक्ती असते. मंत्राच्या साह्याने अशक्य गोष्टही शक्य करता येते. हिंदू धर्म ग्रंथात अनेक मंत्र सांगितलेले आहेत. त्या मंत्राचा नियमित जप केल्याने अवघड कामेही सोपे होतात. आयुष्यात सुख-समृद्धी येते. असाच एक मंत्र खाली दिला आहे.
तुलसी नामाष्टक मंत्र
वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी।
पुष्पसारा नंदनीय तुलसी कृष्ण जीवनी।।
एतभामांष्टक चैव स्त्रोतं नामर्थं संयुतम।
य: पठेत तां च सम्पूज्य सौश्रमेघ फलंलमेता।।
जप विधि
-सकाळी लवकर उठून नित्य कर्म झाल्यानंतर तुळशीची पूजा करून परिक्रमा करावी आणि दिवा लावावा.
- त्यानंतर एकांतामध्ये लोकरीच्या आसनावर बसून तुळशीच्या माळेने वरील मंत्राचा जप करावा. साधकाने पूर्वेकडे तोंड करून बसावे.
- कमीतकमी ५ माळ जप नियमित करावा.
- जप करण्यासाठी एकच वेळ, स्थान, आसन, माळ असेल तर उत्तम आहे.
काही दिवसातच तुमच्या घरात सुख- समृद्धी येईल. तुमचे सर्व अवघड कामे पूर्ण होतील.