Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | this-is-called-real-dedication

जाणून घ्या... पुरुषार्थ या संकल्पनेचा खरा अर्थ

धर्म डेस्क | Update - Jul 16, 2011, 06:31 PM IST

आज आपण पुरुषार्थ या शब्दाची ओळख करून घेणार आहोत.

 • this-is-called-real-dedication

  परिश्रम हा एक साधारण शब्द आहे. आजच्या काळात कष्टाला मोल आहे. सगळीकडूनच हाकाटी ऐकू येते की कष्ट करा, परिश्रम करा. या गोंधळात परिश्रम आणि हमाली यातील अंतरच जणू लुप्त होताना दिसत आहे. या शब्दांशी मिळतेजुळते आणखी एक शब्द आहे पुरुषार्थ.
  आज आपण पुरुषार्थ या शब्दाची ओळख करून घेणार आहोत. परिश्रमात जेव्हा मन, वाचा आणि कर्म एकसारखे असतात तेव्हा त्या परिश्रमाला पुरुषार्थ म्हटले जाते. परिश्रमाची ही उदात्त आणि दिव्य स्थिती आहे. एखाद्याचे बोलणे आणि आचरण किंवा कथनी आणि करणी यात जेवढे कमी अंतर असते तेवढेच कमी अंतर त्याची सफलता आणि शांती यात असते.
  जे लोक हे अंतर संपवितात ते निष्काम कर्मयोगी असतात. असे लोक कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झाले तरी अशांत राहणार नाहीत. आम्ही जे बोलत आहोत आणि कृती करीत आहोत ते योग्यच आहे हे कसे ठरवायचे ? आपल्या परिश्रमाला पुरुषार्थाचे रूप देण्यासाठी निर्णायक बाब कोणती ?
  यासाठी एक प्रयोग करून पाहा. ज्यांच्याजवळ बसल्याने आपल्या चित्तात बदल होऊ लागते अशा लोकांचा शोध घ्या. या लोकांसोबत राहिल्याने, त्यांच्या बोलण्याने, त्यांना पाहिल्याने आपण आतून परिवर्तित होत आहोत, मनात एक सकारात्मकता येत आहे, असे जाणवले पाहिजे. ध्यानात ठेवा की अशा व्यक्तींच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला जे मिळत आहे त्यासाठी जाणीवपूर्वक काही प्रयत्न करावे लागत नसेल. आपोआपच आपल्यात परिवर्तन होत असेल. बस आता आपल्याला शून्य बनवा. स्वत:ला थोडे खाली सोडून द्या.
  जर चांगल्यात चांगल्या व्यक्तिजवळ बसूनही आपण स्वत:ला रिकामे करू शकत नसू तर त्या व्यक्तीकडून चांगली शक्ती आपण आपल्यात भरून घेणार कसे ? त्या व्यक्तींमधून येणा-या चांगल्या तरंगांचा आपण खुल्या मनाने स्वागत करावं. जेव्हा तुम्ही ऊर्जावान झालेले असाल तेव्हा परिश्रम करा. सकारात्मक मनाने केलेले परिश्रमाला पुरुषार्थाचे रूप येईल.

  follow us on twitter @ Divyamarathiweb

Trending