Home | Jeevan Mantra | Dharm | this-is-the-identity-and-merits-of-dedicated-wife

जाणून घ्या... पतिव्रता स्त्री असते कशी ? आणि काही लक्षणे

धर्म डेस्क | Update - Aug 13, 2011, 04:31 PM IST

स्त्री म्हणजे गृहस्थ जीवनाचा आधार होय. त्यामुळे आपल्याकडे पतिव्रता स्त्रीची संकल्पना आहे. आणि तिला मानही आहे.

 • this-is-the-identity-and-merits-of-dedicated-wife

  आजकाल गृहस्थी किंवा अविवाहित पुरुषाला आपल्या बायकोकडून अनेक अपेक्षा असतात. तथाकथित आधुनिक विचारांच्या आडून कुटुंब व्यवस्था तोडण्याचा प्रयत्न होत असला तरी पती-पत्नींनी एकमेकांचा आदर करावा. घरात आनंदी वातावरण असावे. नव-याचे बायकोवर आणि बायकोचे नव-यावर प्रेम असावे असे कोणाला वाटत नाही. सुखी संसाराची आस प्रत्येकालाच असते. जिच्या बोलण्याने, विचाराने आणि वागण्याने घरात आनंद नांदेल अशी पत्नी कोणाला नको आहे ? स्त्री म्हणजे गृहस्थ जीवनाचा आधार होय. त्यामुळे आपल्याकडे पतिव्रता स्त्रीची संकल्पना आहे. आणि तिला मानही आहे.
  हिंदू धर्मात अशी शेकडो उदाहरणे आहेत की ज्यांनी पातिव्रत्य पाळले. पती, परिवार आणि समाजाचे रक्षण केले. यामुळे स्त्री जीवनाला एक उंची प्राप्त करून दिली. त्यामुळेच आजही भारतीय स्त्रीपुढे सती अनुसूया, सीता आदर्शवत आहेत. हिंदू धर्मशास्त्रात पतिव्रता स्त्रीची काही लक्षणे सांगण्यात आली आहेत. ती पुढील प्रमाणे...
  - पतीला देव मानणारी समर्पित स्त्री.
  - दु:ख-कष्टांनी न डगमगता हसतमुखाने आणि प्रसन्न राहणारी.
  - कोणत्याही स्थितीत सुख शोधणारी.
  - नव-यावर निरलस प्रेम करणारी.
  - सेवेने पतिला वश करणारी.
  - पतीच्या कटु वागण्याला सहन करून आनंदी राहणारी.
  - चातुर्याने संसार करणारी.
  - संतानांना जन्मास घालणारी.
  - नव-यापुढे मोठ्यात मोठ्या सुखांना तुच्छ मानणारी.
  - सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होणारी, देवपूजा करणारी, घराला शिस्त लावणारी.
  - सासू सास-यांची काळजी घेणारी.
  - अतिथी, पाहुणे आणि नोकरांशीही विनम्रपणे वागणारी.
  - माहेरी आई वडिलांना सुख देणारी.Trending