सूर्य उपासना : / सूर्य उपासना : या मंत्रात आहे तुमचे भाग्य उजळविण्याची शक्ती

Aug 11,2011 03:37:38 PM IST

मंत्रांमध्ये अपार शक्ती असते. मंत्राच्या बळावर आपण काहीही साध्य करू शकतो. आपले भाग्य उजळविण्याची शक्ती मंत्रांमध्ये असते. जीवनातील अडचणी चुटकीसरसी दूर करण्याची किमया मंत्र करू शकतात. येथे आम्ही एक मंत्र देत आहोत. या मंत्राचा जप विधीपूर्वक केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
मंत्र
ओम ह्रीं घृणीं सूर्य आदित्याय नम:

जप विधी

-रोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान आदी करून मनोमन सूर्यदेवाचे स्मरण करा.
- त्यानंतर उगवत्या सूर्याकडे तोंड करून 12 सूर्यनमस्कार मंत्रांसह करा.
- एका तांब्याच्या पात्रात फुले ठेवून तीन वेळा सूर्याला अर्घ्य द्या.
- या मंत्राचा शक्य तितक्या वेळा उच्चार करा.
- लाल चंदनाच्या माळेने जप करा. लवकरच मंत्र सिद्धीस जाईल.

X