प्रगतीसाठी ध्यानात ठेवा / प्रगतीसाठी ध्यानात ठेवा काही महत्त्वाच्या गोष्टी

दिव्य मराठी

Jul 12,2011 12:59:23 PM IST

सध्या जगात विकासाचा मोठा बोलबाला आहे. स्वत:, कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या चळवळी आपल्या देशात सुरू आहेत. या सर्वच क्षेत्रात आपण योगदान दिले पाहिजे. परंतु याचबरोबर आत्मोन्नतीसाठी आपण सतत सजग आणि सक्रीय राहिले पाहिजे. यासाठी स्वाध्याय अर्थात स्वयंअध्ययनाची गरज असते. आत्मपरीक्षणाची आवश्यकता असते.

स्वयंअध्ययन दोन प्रकारे करता येते. पहिला प्रकार म्हणजे स्वत:च स्वताकडे पाहाणे. दुसरा प्रकार म्हणजे आपल्या जवळपास अशी माणसं असली पाहिजेत की जी दूरून आपले निरीक्षण करतील. योग्य ठिकाणी एखाद्या 'कोच'प्रमाणे मार्गदर्शन करतील. हे काम आई-वडील, जीवनसाथी, मित्र, गरू यापैकी कोणीही करू शकेल. मानसिक उन्नतीत या लोकांचे योगदान महत्त्वाचे ठरते कारण या लोकांशी आपले आत्मीय संबंध असतात.
जे लोक मानसिकदृष्ट्या उन्नत आणि संतुलित असतात त्यांच्या जीवनात सुख आणि दु:खाचे अर्थही बदलतात. शांती आणि सुख या दोन भिन्न गोष्टी आहेत. शांती म्हणजे सुख नव्हे. सुख या शब्दाबरोबर एक झंझट येते. सुखासोबत अनेक गुंतागुंतीच्या गोष्टीही येतात.
कोणत्याही वेळी खात्रीने मिळणारी मदत म्हणजे आपण स्वत: होय, असे विवेकानंद केंद्राचे शिल्पकार मा. एकनाथजी रानडे म्हणतात ते खरेच आहे. आपणच आपल्याला मदत करीत असतो. पण यासाठी आपण स्वत: सक्षम असणे महत्त्वाचे असते. शारीरिक आणि मानसिक किंवा आध्यात्मिक विकासामुळेच मनुष्य ख-या अर्थाने सक्षम बनतो. या विकासासाठी स्वाध्याय म्हत्त्वाचे असते. स्वाध्यायाला किंवा स्वयंअध्ययनाला पर्याय नाही.

X
COMMENT