आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटाच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी घरगुती उपाय

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वयंपाकघरात सतत वापरले जाणारे अद्रक किंवा आले ही बहुगुणी औषधी आहे. पदार्थांना चव आणण्याबरोबरच उपचारासाठी अनेक औषधी तयार करण्यासाठी अद्रक उपयोगी पडते. भारतात सर्वत्र त्याची लागवड केली जाते. जमिनीखाली येत असल्याने त्याचे कंद तयार होतात. अद्रक उकळून त्याची सुंठ तयार केली जाते. अद्रक तिखट रसाचे, पाचक, अग्निदीपक, मलसारक आहे. जेवण्यापूर्वी आले खाल्ल्यास भूक वाढते. तोंडाची चवही चांगली होते. आम्लपित्त, पोटात दुखणे, गॅसेस होणे, नेहमी अजीर्ण होणे, भूक कमी लागणे अशा जुन्या तक्रारी असल्यास जेवणापूर्वी आले गुळाबरोबरच थोडे दिवस खावे. दम्याचा त्रास होत असताना चमचाभर आल्याचा रस तूप साखरेसोबत घ्यावा. सांधे दुखत असल्यास सांध्यांना आल्याच्या रसात मीठ घालून चोळून घ्यावे. आजारी व्यक्तींना मिरचीच्या तिखटाऐवजी चव आणण्यास आले वापरावे. पोट दुखत असल्यास चमचाभर आल्याचा रस पादेलोण, लिंबाचा रस घालून घ्यावा.