Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | want to child do moday of shankar puja

अपत्यप्राप्तीसाठी श्रावण सोमवारी करा हा उपाय

धर्म डेस्क | Update - Jul 25, 2011, 01:28 PM IST

भगवान महादेव जर भक्तावर प्रसन्न झाले तर भक्ताची प्रत्येक मनोकामना ते पूर्ण करतात.

  • want to child do moday of shankar puja

    देवांमध्ये भगवान महादेवास सर्वश्रेष्ठ देव मानले जाते. भगवान महादेव जर भक्तावर प्रसन्न झाले तर भक्ताची प्रत्येक मनोकामना ते पूर्ण करतात. श्रावण महिन्यात महादेवाची विशेष उपासना केल्यास भक्तांसाठी चांगले असते. ज्या दांपत्याला अपत्य नाही त्यांनी जर श्रावण महिन्याच्या कोणत्याही सोमवारी खाली दिल्याप्रमाणे भगवान महादेवाची पूजा केल्यास त्यांना लवकरच पुत्रप्राप्ती होते.

    उपाय
    श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून, स्वच्छ वस्त्रे परिधान करून शंकराची पूजा करावी. पूजेनंतर गव्हाच्या पीठाच्या कणकेचे ११ शिवलिंग बनवावे. प्रत्येक शिवलिंगासमोर शिवमहिमस्त्रोत म्हणत जलाभिषेक करावा. असा जलाभिषेक सर्व ११ शिवलिंगावर करावा. तो जलाभिषेक प्रसाद रूपात ग्रहन करावा. गर्भाच्या रक्षणासाठी आणि अपत्य प्राप्तीसाठी गर्भगौरी रूद्राक्ष धारण करावे. हे रूद्राक्ष धारण करताना शुभ मुहूर्त पाहून तो धारण केल्यास त्याचे चांगले फळ मिळते.
    हा उपाय केल्यास लवकरच अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होईल.Trending