Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | want to money do this

पाहिजे तितका पैसा मिळवण्यासाठी करा हे उपाय

धर्म डेस्क. उज्जैन | Update - Jul 22, 2011, 11:36 AM IST

पैसा ही एक अशी वस्तू आहे, की जी किती असली तरी कमीच वाटते. प्रत्येक मनुष्याला वाटते की त्याच्या धन संपत्तीमध्ये कधीही कमतरता येऊ नये.

 • want to money do this

  पैसा ही एक अशी वस्तू आहे, की जी किती असली तरी कमीच वाटते. प्रत्येक मनुष्याला वाटते की त्याच्या धन संपत्तीमध्ये कधीही कमतरता येऊ नये. परंतु, जीवनातील चढ-उतारामुळे हे होऊ शकत नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात कधी पैशांची अडचण भासू नये आणि लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहावी, त्यासाठी खाली काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने घरामध्ये पैशांची अडचण भासणार नाही.
  उपाय
  * गुरुवारी पुष्य नक्षत्रादिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रुमालात ठेवा. हळदीने रंगविलेले तांदूळ, नारळ आणि एक सुपारी त्याच रुमालात ठेवा. हळदीत रंगविलेला एक रुपया त्यामध्ये ठेऊन त्याची पूजा करा. असे दररोज करा. या उपायाने धन-धान्यामध्ये वाढ होते.
  * धन प्राप्तीसाठी रोज देवी लक्ष्मीची पूजा करा आणि एक लवंग अर्पण करा. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते.
  * ११ कवड्या शुद्ध केशरामध्ये रंगवून पिवळ्या कपड्यात बांधा आणि पैसे ठेवण्याच्या जागेवर ते ठेवा. त्यामुळे धन येत राहते.
  * रात्री दहा नंतर सर्व कामे संपवून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसा. समोर तेलाचे नऊ दिवे लावा. हे दिवे पूजा करतांना विझले नाही पाहिजेत. लाल रंगाचे तांदूळ घ्या. त्यावर श्रीयंत्र ठेवा आणि त्याची पूजा करा, हा उपाय केल्याने धन लाभ होईल.

Trending