Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | what is sin and punya

पाप - पुण्य हे आपल्याला स्वर्ग - नरकात कसे घेऊन जातात ?

धर्म डेस्क | Update - Sep 24, 2011, 01:28 PM IST

काही लोकांचा समज आहे की स्वर्ग आणि नरक मृत्यूनंतरची अवस्था आहे. असूही शकते. मात्र

  • what is sin and punya

    सत्याचा संबंध केवळ शब्दांशी नाहीय. शब्दात सत्य शोधणे साधारण सवय आहे. पण स्थितीमध्ये सत्य शोधणे कठीण बाब आहे. यासाठी आपल्या आत खोलवर उतरावे लागते आणि बाहेरच्या परिस्थितीकडे दूरदृष्टीने पाहावे लागते. कारण सत्य इतके मजबूत असते की त्याला कोणत्याच हत्याराने कापणे शक्य नसते. त्यामुळे याला पाहायचे किंवा जाणून घ्यायचे तर ते अवश्य करावे. सत्कर्म, सद्विचार, सद्भाव व चांगला उद्देश ही सत्याची प्रतिरूपे आहेत.
    आपल्याकडे स्वर्ग आणि नरक याची एक प्राचीन धारणा आहे. काही लोकांचा समज आहे की स्वर्ग आणि नरक मृत्यूनंतरची अवस्था आहे. असूही शकते. मात्र जोपर्यंत आयुष्याचा प्रश्न आहे, तोपर्यंत त्याची सत्याशी सांगड घालायला हवी. कोण नरकात जाईल? परंतु सत्य तर हे आहे की जो वाईट कर्म करील, तो नरकात जाईल. जातो की नाही हे तर भविष्यात दडलेले आहे. मात्र जगत आहे आणि येथेच जगावे लागते. त्यामुळे जितके आपण असत्याच्या बाजूने राहू तितकेच चुकीच्या गोष्टी करू आणि तेवढेच आपले पतन होईल. पतनाची पीडा हाच नरक आहे. त्यामुळे आपण म्हणतो हे आयुष्य नरक झाले. झाले नाही तर बनवून घेतले.
    पाप आणि पुण्य आपल्याला स्वर्ग आणि नरकात घेऊन जाईल. या विषयाबाबत वादविवाद होऊ शकतो, परंतु एका गोष्टीवर सर्वांनाच सहमत व्हावे लागेल की आपल्या पापाचे फळ नरक आहे आणि पुण्याचे फळ स्वर्ग आहे. त्यामुळे जीवन शक्य असेल तितके सत्याच्या बाजूने ठेवा.Trending