Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | what-sin-which-is-punished-after-death

मृत्यूनंतर कोणत्या पापासाठी काय शिक्षा भोगावी लागते ?

धर्म डेस्क | Update - Aug 24, 2011, 07:52 PM IST

गरुड पुराणात काही पापांची नावे आणि त्यासाठीची शिक्षा याचे वर्णन मिळते.

 • what-sin-which-is-punished-after-death

  पाप केल्यानंतर त्या पापाचे फळ भोगावेच लागते असे म्हणतात. माणूस जीवनात पाप करतो, त्या पापाचे प्रायश्चित न केल्यास त्यांस यमलोकात शिक्षा भोगावी लागते. एखादी गोष्ट पाप की पुण्या याबद्दलही लोक वाद घालत असतात. परंतु गरुड पुराणात काही पापांची नावे आणि त्यासाठीची शिक्षा याचे वर्णन मिळते.
  गरुडजी म्हणाले, भगवन जीवांना त्यांच्या कोणत्या पापाची काय शिक्षा मिळते ? पुढील जन्म कसा असतो, तेही सांगा.
  यावर भगवंत म्हणतात, गरुड लक्षपूर्वक ऐक...
  - ब्रह्महत्या करणारा क्षयरोगी.
  - गोहत्या करणारा कुबडा.
  - कन्याहत्या करणा-याला अंगावर कोड फुटतात.
  - स्त्रीवर हात उगारणारा रोगी.
  - परस्त्री गमन करणारा नपुंसक.
  - मांस आणि मदिरा घेणा-याचे दात काळे आणि शरीर लाल होतात.
  - अहंकाराने गुरूचा अपमान करणारा मिरगी.
  - खोटी साक्ष देणारा मुका.
  - खोटे बोलणारा बहिरा.
  - विष देणारा वेडा.
  - अन्न चोरणारा उंदीर.
  - नव-याचा मान न ठेवणारी ऊ.
  - परपुरुषाची कामना करणारी कुत्री.
  - मित्राच्या बायकोची कामना करणारा गाढव.

Trending