Home »Jeevan Mantra »Disha Jeevanachi» Which-Type-Of-Girl-Is-Best-To-Marry-According-Chanakya-Niti

चाणक्य नीती 8 : अशा सुंदर मुलीशी विवाह करू नये, कारण...

धर्म डेस्क | Oct 21, 2011, 17:32 PM IST

  • चाणक्य नीती 8 : अशा सुंदर मुलीशी विवाह करू नये, कारण...

लग्न किंवा विवाह हा जीवनातील महत्त्वाचा संस्कार होय. साधारणपणे प्रत्येक मनुष्याचे लग्न होत असते. लग्नानंतर वधु-वरांसोबतच दोन्ही कुटुंबांचे जीवनही बदलत असते. म्हणूनच लग्न कोणाशी करावे, या मुद्दयावर सावधपणे निर्णय घेणे आवश्यक असते.
कोणत्या प्रकारच्या मुलीशी लग्न केले पाहिजे, या विषयावर आचार्य चाणक्य यांनी मार्गदर्शन केले आहे.
वरयेत् कुलजां प्राज्ञो विरूपामपि कन्यकाम्।
रूपशीलां न नीचस्य विवाह: सदृशे कुले।।
आचार्य चाणक्य म्हणतात की, विवाहासाठी नारीचे बाह्य सौंदर्य न पाहता मनाचे सौंदर्य पाहणारा माणूस हा विचारी असतो. एखादी कुरुप मुलगीही जर सुसंस्कारी असेल तर तिच्याशी लग्न केले पाहिजे. एखादी दिसायला सुंदर अशी मुलगी जर संस्कारहीन असेल, अधार्मिक किंवा वाईट स्वभावाची असेल तर कोणत्याही परिस्थितीत तिच्याशी विवाह करू नये. विवाह सदैव समान कुलात अर्थात समान संस्कार असलेल्यांमध्येच करणे शुभ होय.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार विचारी आणि श्रेष्ठ मनुष्य तोच की जो उच्च कुलात जन्म घेणा-या सुसंस्कारित अशा मुलीशी लग्न करतो. विवाहानंतर कन्येचे गुणच घराला पुढे नेतात. सुंदर परंतु नीच संस्कार कुलात वाढलेली मुलगी लग्नानंतर परिवार तोडते. अशा मुलींचा स्वभाव आणि आचरण अतिशय कमी स्तराचा असतो. धार्मिक आणि ईश्वरावर श्रद्धा असणा-या संस्कारी मुलीचे आचार विचार शुद्ध असतात. ती श्रेष्ठ परिवाराची निर्मिती करू शकते.
चाणक्य नीती 7 : तुमच्यातल्या या एका गुणाने दरवळेल तुमची कीर्ती
चाणक्य नीती 6 : कशी आणि कधी होते पत्नीची खरी परीक्षा ?
चाणक्य नीती 5 : सदैव आनंदी रहायचे असेल तर असं जगा
चाणक्य नीती 4 : ज्या गोष्टी लपविण्यासारख्या आहेत त्या गुप्तच ठेवा
चाणक्य नीती 3 : खूप मोठी गोष्ट नाही, तुम्हीही बनू शकता महान...

Next Article

Recommended