Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | who is responsible for addiction

व्यसने आपल्याला नव्हे, आपणच व्यसनांना धरून ठेवतो

दिव्य मराठी | Update - Jul 12, 2011, 01:12 PM IST

आपल्या व्यक्तिमत्त्वातून वाईट गोष्टी काढून जीवनाचे नंदनवन बनवणे अगदी सोपे आहे.

 • who is responsible for addiction

  आपल्या व्यक्तिमत्त्वातून वाईट गोष्टी काढून जीवनाचे नंदनवन बनवणे अगदी सोपे आहे. वाईट गोष्टी सोडायला सुरुवात करा. दुस-या कोणाच्या भरोशावर तुम्ही तुमच्यातल्या वाईट सवयी काढून टाकू शकत नाही. यासाठी दृढसंकल्पाची आवश्यकता असते. आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनातील एक सत्यघटना येथे देत आहोत. दृढ विश्वास आणि संकल्प यांचे महत्त्व या घटनेतून आपल्या ध्यानात येऊ शकेल.
  आचार्य विनोबांकडे एकदा एक दारूडा तरुण आला. हात जोडून विनवणी करू लागला. मी खूप दु:खी आहे. मला दारूने घेरले आहे. दारू सोडायची माझी तीव्र इच्छा आहे, पण दारू सुटत नाहीय. आपण काहीतरी उपाय सांगा. विनोबाजींनी थोडा विचार केला आणि दुस-या दिवशी भेटीस बोलावले.
  दुस-या दिवशी तो तरुण सकाळी लगबगीने आला. त्याने विनोबाजींना हाक दिली. विनोबा म्हणाले अरे आत ये. त्याला आश्चर्य वाटले. विनोबा एका खांबाला घट्ट पकडून उभे होते. तरुणाने जिज्ञासेने असे करण्याचे कारण विचारले. विनोबा म्हणाले, अरे या खांबाने मला पकडून ठेवले आहे. कितीतरी वेळ झाले पण खांब मला सोडत नाहीय. तरुणाला आश्चर्य वाटले आणि हसूही आले. तरुण म्हणाला, खांबाला तर तुम्ही स्वताच पकडले आहात. तुम्ही खांबाला सोडा म्हणजे आपोआप तुमची सुटका होईल.
  विनोबा हसले. तरुणाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, बाळ मी हेच तर तुला सांगणार होतो. दारूला तू कवटाळून बसलास. तू ठरवलास तर तुझे व्यसन सुटू शकेल.

  तरुणाचे डोळे उघडले. त्याने दृढनिश्चय केला आणि त्याचे व्यसन सुटले. तुम्हालाही कोणत्यातरी व्यसनाने घेरले आहे असे वाटत असेल तर आज आणि आताच दृढ निश्चय करा.

Trending