Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | why are black thread tied to avoid-eye

द्रुष्ट लागू नये म्हणून काळा दोरा का बांधतात?

धर्म डेस्क. उज्जैन | Update - Jul 22, 2011, 11:39 AM IST

जर आपल्या जीवनातील आनंदाचे क्षण दुःखात परिवर्तीत होत असतील, प्राप्त होणारे धन अचानक कमी होणे, कुटुंबामध्ये तंटे होत असतील

  • why are black thread tied to avoid-eye

    जर आपल्या जीवनातील आनंदाचे क्षण दुःखात परिवर्तीत होत असतील, प्राप्त होणारे धन अचानक कमी होणे, कुटुंबामध्ये तंटे होत असतील, अशा प्रकारच्या घटना जर आयुष्यात घडू लागल्या तर समजून घ्यावे की आपल्या घराला कोणाचीतरी द्रुष्ट लागली आहे. द्रुष्ट नजरेपासून वाचण्यासाठी ज्योतिष शास्त्रात बरेच उपाय सांगितले गेले आहेत. जसे की लहान मुलांना द्रुष्ट लागू नये म्हणून काळा ठिपका लावतात. द्रुष्ट लागणार याला वैज्ञानिक कारण पण आहे. आपले शरीर पंचतत्वांनी तयार झाले आहे. हे पाच तत्त्व पृथ्वी, वायू, अग्नि, पाणी,आणि आकाश हे आहेत. या पंचतत्त्वांपासून मिळणाऱ्या ऊर्जेपासून आपले शरीर चालते. या पंचतत्त्वांपासून मिळणाऱ्या ऊर्जेपासून आपण सर्व सुखसुविधा प्राप्त करतो. जेंव्हा मनुष्याच्या सुखसुविधांना वाईट द्रुष्ट लागते, तेंव्हा पंचत्त्वांपासून मिळणारी सकारात्मक उर्जा आपल्यापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे गळ्यात काळा दोरा बांधतात. विज्ञानामध्ये काळा रंग हा उष्णतारोधक आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे काळा दोरा हा वाईट नजर आणि दुषित ऊर्जेला आपल्या पासून दूर ठेवतो. त्यामुळे वाईट द्रुष्ट लागू नये, म्हणून काळा दोरा बांधला जातो.

Trending