जाणून घ्या... गणपतीला / जाणून घ्या... गणपतीला दुर्वा का वाहतात ?

धर्म डेस्क

Aug 13,2011 03:18:10 PM IST

गणांचा अधिपती गणपती. ज्योतिष शास्त्रात गणपतीला केतु देवता म्हणतात. गणपतीचे डोक हत्तीसारखे आहे, त्यामुळे गणपतीला गजानन म्हणतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतात. गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात. यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला दुर्वा खूपच प्रिय आहेत. एकवीस दुर्वांची मिळून जुडी करतात. या जुडी गणपतीला अर्पण करतात.
गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक आख्यायिका आहे. ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असूराला गिळून टाकले. यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. यावेळी कश्यप ऋषींनी दुर्वांच्या 21 जुडी गणेशाला खायला दिली. ( ऋषी कश्यप यांच्या नावावरूनच काश्मीर हे नाव पडले आहे. ) यामुळे पोटातली जळजळ थांबली. दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे.
या कथेच्या माध्यमातून आपल्याला असा संदेश मिळतो की पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दूर्वा औषधी आहे. मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभकारक आहे. अनेक आजारांत एंटीबायोटिक म्हणून दुर्वा उपयोगी पडते. कॅन्सरच्या रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञाना आढळून आले आहे.

X
COMMENT