चार महिने भगवान / चार महिने भगवान विष्णुंचे वास्तव्य पाताळात का असते ?

Jul 13,2011 11:11:13 AM IST

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. सूर्य जेव्हा मिथून राशीत प्रवेश करतो तेव्हा ही एकादशी येते. धर्मशास्त्रानुसार या दिवसांत भगवान विष्णूंचे वास्तव्य पाताळात असते. या काळात ते क्षीरसागरात निद्रा घेतात. मग चार महिन्यानंतर तूळ राशीत सूर्याचा प्रवेश झल्यानंतर पुन्हा ते सृष्टीचे संचालन करू लागतात. म्हणूनच या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या काळात कोणतेही मंगल कार्य करण्यात येत नाही. यावेळी देवशयनी एकादशी 11 जुलै, सोमवारी आहे.
धर्मशास्त्रानुसार वामन रुपातील भगवंताने बळीराजाला यज्ञप्रसंगी तीन पावलं भूमी मागीतली. भगवंताने पहिल्या पावलात पृथ्वी, आकाश आणि सर्व दिशा व्यापून टाकल्या, दुस-या पावलात स्वर्गलोक व्यापलं. तिसरे पाऊल आपल्या डोक्यावर ठेवावं अशी बळीराजाने विनंती केली. या दानाने प्रसन्न होऊन भगवंताने बळीला पाताळाचा राजा बनविले आणि वर मागण्यास सांगितले. बळीराजाने विनंती केली की भगवंताने सदैव त्याच्या महलात राहावे. बळीराजाच्या भक्तीचा मान राखत भगवंताने वर्षातून चार महिने तिथे निवास करण्याचे मान्य केले. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णु देवशयनी एकादशीपासून देव प्रबोधिनी एकादशीपर्यत पाताळलोकात बळीच्या महलात निवास करतात. याच काळाला चातुर्मास म्हणतात.

X