कोणत्याही कार्याचा शुभारंभ / कोणत्याही कार्याचा शुभारंभ नारळ फोडून का करतात ?

Aug 11,2011 04:18:30 PM IST

नारळ वरून अतिशय कठीण आहे आणि आतून मऊ. कठीण नारळाच्या आत गोड पाणी आहे. नारळाला आपण श्रीफळ म्हणतो. पूजा करताना आपण देवासमोर नारळ फोडतो. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य मुहूर्त पाहून करतात. मुहूर्तावर नारळ फोडले जाते आणि आणि दिवा लावला जातो. परंतु कोणतेही शुभकार्य करताना नारळ का फोडला जातो ?
अनिष्ट शक्तींच्या संचारावर अंकुश लावण्यासाठी आणि स्थानदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नारळ फोडला जातो. स्थानदेवतेची कृपा प्राप्त करण्यासाठी आवाहन केले जाते. नारळाच्या जलाने स्थान देवतेचे तरंग सर्व दिशांना पसरतात. यामुळे कार्यस्थळात प्रवेश करणा-या कष्टदायी स्पंदनांच्या गतीवर नियंत्रण येते. स्थानदेवतेच्या सूक्ष्म तरंगांचे मंडल तयार होते आणि कार्य निर्विघ्नपणे पार पडते.

X