Home | Jeevan Mantra | Dharm | why-lord-shiv-worship-period-called-shrawan

शिवभक्तीच्या महिन्याला 'श्रावण' नाव कशावरून पडले ?

धर्म डेस्क | Update - Jul 14, 2011, 07:52 PM IST

यंदा 16 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरूवात होत आहे.

  • why-lord-shiv-worship-period-called-shrawan

    हिंदू वर्षातील पाचवा महिना म्हणजे श्रावण. यंदा 16 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरूवात होत आहे. हा महिना शिवभक्तीचा महिना असल्याने या महिन्याला पुण्य काळ मानण्यात येतो. भारतात काही प्रांतात 'सावन' नावानेही श्रावण महिन्याला ओळखले जाते. शिव उपासनेच्या या विशेष महिन्याला श्रावण हे नाव मिळण्यामागेही धार्मिक महत्त्व आहे आणि कालगणनेचा आधारही.
    हिंदू पंचागात भारतीय कालगणना आणि ज्योतिष शास्त्रांनुसार प्रत्येक महिन्याला नाव निश्चित करण्यात आले आहे. हिंदू वर्षाची सुरूवात चैत्र महिन्याने होते. प्रत्येक महिन्यात ग्रह नक्षत्रांची चाल आणि स्थिती यात बदल होते. याच क्रमाने पाचव्या महिन्यात पौर्णिमेपासून आकाशात श्रवण नक्षत्राचा योग बनतो. या नक्षत्राच्या नावावरून या महिन्याचे नाव श्रावण म्हणून प्रसिद्ध झाले आहे.
    धार्मिक दृष्टिकोनातूनही श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या महिन्यांना चातुर्मास म्हटले जाते. आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने चातुर्मासाचा काळ हा पुण्य काळ आहे. साधू संतच नव्हे तर सर्वसामान्य मनुष्यही या काळात भक्ती आणि उपासनेत डुंबत असतो. श्रावण महिन्यात शिवभक्तीची सुरूवात होते. पुढील महिन्यांतही भगवान शिवशंकरांच्या परिवारातील सदस्यांची भक्ती सुरू होते. भाद्रपद महिन्यात गणेशचतुर्थी, अश्विन आणि कार्तिक महिन्यात देवी उपासना सुरू असते.

Trending