पिण्याचा पाण्याच्या जागेवर / पिण्याचा पाण्याच्या जागेवर दिवा का लावावा?

धर्मडेस्क. उज्जैन

Jul 25,2011 03:00:59 PM IST

वास्तू शास्त्रानुसार जीवनात प्राप्त होणारे सुख दुःख हे आपल्या घराच्या स्थितीवर अवलंबून असतात. जर घरामध्ये काही वास्तू दोष असेल तर, त्याच्या वाईट परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागते.
वास्तू सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक उर्जेच्या सिद्धांतावर काम करते. त्यामुळे घरामध्ये जी गोष्ट नेगेटिव एनर्जीला वाढवते, त्यामुळे वास्तुदोष वाढतो. एखाद्या घराची आर्थिक उन्नती होत नसेल, कष्ट करूनसुद्धा पाहिजे तसे यश मिळत नसेल, सतत संकटाना सामोरे जावे लागत असेल, घरात सतत अपघात होत असतील तर, त्या घरामध्ये पितृदोष असतो.
त्यामुळे ज्या घरामध्ये पिण्याचे पाणी दक्षिण दिशेला असेल त्या घरात पितृदोषचा प्रभाव राहत नाही आणि नियमित त्या जागेवर तुपाचा दिवा लावला तर पितृदोष आशिर्वादामध्ये बदलला जातो.
जर पिण्याच्या पाण्याचे स्थान उत्तर पूर्व दिशेला असेल तर ते योग्य स्थान आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा तुपाचा दिवा लावला तर पितृदोष नष्ट होतो. कारण पाण्यामध्ये पितृचा वास आहे असे मानले गेले आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा जागेवर दिवा लावल्याने पितृदोषाची शांती होत असे सांगितले गेले आहे.

X
COMMENT