Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | why-you-should-keep-in-mind-before-going-out

घराबाहेर पडण्यापूर्वी हे लक्षात ठेवणे आवश्यक

धर्मडेस्क. उज्जैन | Update - Jul 18, 2011, 12:43 PM IST

काही कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी आपण शकून किंवा अपशकून मनात घेऊनच घराबाहेर पडतो.

 • why-you-should-keep-in-mind-before-going-out

  काही कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी आपण शकून किंवा अपशकून मनात घेऊनच घराबाहेर पडतो. आपल्याकडे प्रवास करतानाही अनेक गोष्टींचा विचार केला जातो. बुधवारी कोणत्याही प्रकारचा प्रवास करणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे बुधवारी प्रवास करणे टाळले पाहिजे.

  मात्र, ज्योतिष शास्त्रानुसार आठवड्यात प्रत्येक दिवशी कोणत्यातरी दिशेला प्रवास करणे टाळावे. अशुभ दिशेने प्रवास केल्यास ते काम होत नाही आणि आर्थिक नुकसान किंवा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यादिवशी त्या दिशेचा प्रवास धोकादायक आहे, त्या दिशेचा प्रवास टाळणेच योग्य आहे.

  जाणून घेउया कोणत्या दिवशी कोणत्या दिशेला प्रवास करणे अशुभ असते -

  - शनिवार आणि सोमवारी पूर्व दिशेला प्रवास करणे टाळावे. या दिवशी पूर्व दिशेला प्रवास केल्यास काम असफल होण्याची शक्यता असते.
  - बुधवार आणि मंगळवारी उत्तर दिशेला प्रवास करणे टाळावे. या दिवशी उत्तर दिशेला प्रवास केल्यास कामात अडचणी येण्याची शक्यता आहे.
  - गुरुवारी दक्षिण दिशेचा प्रवास टाळावा.
  - शुक्रवार आणि रविवारी पश्चिम दिशेच्या प्रवासाचा त्याग केला पाहिजे.
  follow us on twitter @ Divyamarathiweb

Trending