सर्व इच्छा पूर्ण / सर्व इच्छा पूर्ण होतील, देवाला अर्पण करा फूल

धर्म डेस्क. उज्जैन

Aug 17,2011 01:13:34 PM IST

हिंदू धर्मशास्त्रात विभिन्न कर्म कांड आहेत त्यामध्ये फुलांना विशेष महत्व आहे. धार्मिक अनुष्ठान, पूजा, आरती. अशा विलेस फुले महत्वाची असतात. धर्म शास्त्रानुसार देवाला आवडणारे विशेष फूल जर अर्पण केले तर देव लवकर प्रसन्न होतात.
श्रीगणेश - आचार भूषण ग्रंथानुसार श्रीगणेशाला तुलसीदल सोडून सर्व प्रकारचे फूल अर्पण करू शकता.
महादेव - महादेवाला धोत्र्याचे फूल, कन्हेरीचे फूल, अर्पण करावे.
सूर्यदेव - सूर्यदेवाला कमळ, चंपा, पालाश, अशोक झाडाची फुले अर्पण करावीत
पार्वती - महादेवाला आवडणारे फूल देवी पार्वतीला प्रिय आहेत. त्या व्यतिरिक्त बेल, पांढरे कमळ चंपा हे फूल पार्वतीला अर्पण करावे.
श्रीकृष्ण- आपल्या प्रिय फुलांचे वर्णन करताना महाभारतात युधिष्ठिराला श्रीकृष्ण सांगतात की मला कुमुद, करवरी, चणक, मालती, नंदिक, पलाश व वनमालेचे फूले प्रिय आहेत.
लक्ष्मी- लक्ष्मीला सर्वाधिक प्रिय पुष्प कमळ आहे.
विष्णु- विष्णूला कमळ, जूही, कर्दळ, केवड़ा, चमेली, अशोक, मालती, वासंती, चंपा, वैजयंती हे फुले विशेष प्रिय आहेत. कोणत्याही देवाच्या पूजेमध्ये केतकीचे फूल अर्पण करू नये.

X
COMMENT