आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी नसतात सर्वच व्यायाम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांच्या व्यायामाशी संबंधित गरजा वेगळ्या असतात, त्यामुळे त्यांचे शरीर सर्वच व्यायामाला अनुरूप नसते. तज्ज्ञांच्या मते याची अनेक कारणे आहेत. असे का होते, ते जाणून घेऊया...
१>महिलांच्या शरीरात लीन मसल्स कमी असतात, त्यामुळे त्यांचे स्नायूही व्यायाम करताना पुरुषांच्या तुलनेत वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात.
२>हार्मोन्समुळे महिलांच्या शरीरात फॅटचे विभाजन पुरुषांच्या तुलनेत वेगळे असते. महिलांच्या शरीरात आढळून येणारे अ‍ॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन मासिक पाळीनुसार कमी-जास्त असतात. त्यामुळेच महिलांमध्ये फूड क्रेव्हिंग, वॉटर रिटेन्शन (सूज येणे) आणि भावनात्मक चढ-उतार येतात.
३>महिलांनी पोटाचा खालचा भाग बळकट करणारा व्यायाम केला पाहिजे. कारण बाळंतपणाच्या वेळी पोटाच्या या भागानेच त्यांना अधिक जोर लावावा लागतो, त्यामुळे हा भाग कमजोर पडतो. तसेच या वेळी पाठीवरही जोर पडतो.
४>कोर मसल्ससाठी व्यायाम करणेसुद्धा महिलांसाठी आवश्यक ठरते. कारण यामुळे शरीराचा वरचा भाग म्हणजेच धडाला बळकटी मिळते. महिलांचे मणक्याचे हाड अत्यंत लवचीक असते. त्यामुळे वय वाढण्यासोबतच शरीराच्या अलाइनमेंटवर पडणा-या वाईट परिणामांना रोखण्यासाठी हे गरजेचे आहे.