Home | Sports | From The Field | -india-vs-australia-sydney-test-live-score

सिडनी कसोटी- टीम इंडियाची हा‍राकिरी सुरूच, सचिनही परतला तंबूत

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jan 03, 2012, 09:22 AM IST

भारताने नाणेफेक जिंकून पहिल्‍यांदा फलंदाजी करण्‍याचा निर्णय घेतला. पहिल्‍या कसोटीत अपयशी ठरलेल्‍या विराट कोहलीला दुस-या कसोटीतही संधी देण्‍यात आली आहे.

 • -india-vs-australia-sydney-test-live-score

  सिडनी- भारत-ऑस्‍ट्रेलिया कसोटी मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामन्‍यात टीम इंडियाने सहा गडयांच्‍या बदल्‍यात 161 धावा केल्‍या. महेंद्रसिंह धोनी आणि आर. अश्विन खेळत आहेत.
  जेम्‍स पॅटिन्‍सनने घातक गोलंदाजी करताना टीम इंडियाला चांगलेच अडचणीत आणले. पॅटिन्‍सनने महाशतकाकडे वाटचाल करणा-या सचिन तेंडुलकरला 41 धावांवर टिपले. त्‍यापूर्वी पीटर सीडलने विराट कोहलीला बाद केले होते.
  सलामीवीर वीरेंद्र सेहवागला पॅटिन्‍सने बाद केले. हिल्‍फेनहासच्‍या गोलंदाजीवर मिळालेल्‍या जीवदानाचा फायदा ही सेहवागला उचलता आला नाही. रिकी पॉंटिंगने दुस-या स्‍लीपमध्‍ये त्‍याचा झेल सोडला होता. त्‍यानंतर 30 धावांवर तो बाद झाला. सेहवाग पाठोपाठ व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मणही झटपट बाद झाला.
  टीम इंडियाला गौतम गंभीरच्‍या रूपात पहिला धक्‍का बसला. पहिल्‍याच षटकाच्‍या तिस-या चेंडूवर गंभीर शून्‍य धावेवर तंबूत परतला. मेलबर्न कसोटीत हिरो ठरलेल्‍या जेम्‍स पॅटिन्‍सनने गंभीरला बाद केले. त्‍यानंतर भरवश्‍याचा फलंदाज राहुल द्रविडलाही काही खास करता आले नाही. पीटर सीडलने त्‍याला पाच धावांवर बाद केले.
  यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून पहिल्‍यांदा फलंदाजी करण्‍याचा निर्णय घेतला. पहिल्‍या कसोटीत अपयशी ठरलेल्‍या विराट कोहलीला दुस-या कसोटीतही संधी देण्‍यात आली आहे. मालिकेत ऑस्‍ट्रेलिया 1-0 ने आघाडीवर आहे.

Trending