आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-२० सामना : भारत-श्रीलंका यांच्यात आज रात्री लढत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पल्लेकल- भारताचा धडाखेबाज फलंदाज विराट कोहलीच्या ६८ धावा व अशोक डिंडाने ४ व इरफान पठाणने घेतलेल्या तीन गड्यामुळे भारताने श्रीलंकेचा ३९ धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या १५६ धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघ १८ षटकात सर्वबाद ११६ धावाच करु शकला. भारताकडून मध्यमगती गोलंदाज अशोक डिंडाने चार षटकात १९ धावा देत ४ गडी टिपले तर, इरफान पठाणने ४ षटकात २७ धावा देत तीन धक्के दिले. विराट कोहलीचा सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
१५६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. महेला जयवर्धने (२६), तिलकरत्ने दिलशान (०) व उपुल थरंगा (५) या तिघांना इरफान पठाणने आपल्या पहिल्या तीन षटकात टिपले. महेलाने १९ चेंडूत पाच चौकारासह २६ धावा केल्या आहेत. महेलाने उमेश यादवच्या एका षटकात चार चौकार ठोकले. त्यानंतर मॅथ्यूज (३१) व थिरिमने (२०) श्रीलंकेला सुस्थित नेऊन ठेवले. मात्र त्याच वेळी थिरिमनेला आश्विनने त्रिफळाचित केले. तर मॅथ्यूजचा अडसर अशोक डिंडाने दूर केला. मॅथ्यूजने २९ चेंडूत तीन चौकारासह ३१ तर थिरिमनेने १५ चेंडूत दोन चौकारासह २० धावा केल्या. त्यानंतर मात्र लंकन फलंदाजांना फार काही करता आले नाही. अखेर श्रीलंकेचा संघ १५ षटकात सर्वबाद ११६ धावाच करु शकला.
त्याआधी विराट कोहलीच्या ६८ धावांच्या जोरावर भारताने २० षटकात ३ बाद १५५ धावा केल्या होत्या. सुरेश रैना (नाबाद ३४), अजिंक्य रहाणे (२१) व महेंद्रसिंग धोनी (नाबाद १६) धावा केल्या. गौतम गंभीर केवळ ६ धावांवर बाद झाला. त्याला एरांगाने त्रिफळाचित केले.
विराटच्या ६८ धावा- विराट कोहलीने श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या मर्यादा उघड्या करीत पहिल्या सहा षटकातच ९ चौकार वसूल केले. त्याने १९ चेंडूत ९ चौकारासह ३८ धावा केल्या. त्यातील ३६ धावा या फक्त चौकाराच्या होत्या. दुस-या बाजूने सलामीचा जोडीदार अजिंक्य रहाणे विराटला साथ देत आहे. दरम्यान, विराटने ३२ चेंडूत १० चौकारासह अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर त्याला फार वेगाने धावा घेता आल्या नाहीत. तो ६८ धावांवर बाद झाला. ४८ चेंडूत ११ चौकार व एक षटकारासह ही खेळी त्याने साकारली.
रहाणे २१ धावांवर बाद- सलामीवीर अजिंक्य रहाणे २५ चेंडूत २१ धावा काढून बाद झाला. २१ धावा करताना त्याने एक षटकार मारला. त्याला मेंडीसने झेलबाद केले.
भारत आणि श्रीलंका यांच्यात २००९ पासून आतापर्यंत चार सामने झाले होते. त्यातील दोन्ही संघानी प्रत्येकी दोन सामने जिंकले होते. आता झालेला एकमेव टी-२० सामना भारताने जिंकला आहे. याआधी भारताने श्रीलंकेतील पाच एकदिवसीय सामन्याची मालिका ४-१ ने जिंकत जागतिक क्रमवारीत पुन्हा दुसरे स्थान पटकावले.
इरफान टी-20 साठी लाभदायक खेळाडू : गावसकर
RECORD: कोहली बनला वेगाने धावा काढणारा फलंदाज
भारताचा श्रीलंकेवर विजय, कोहलीची 'विराट' कामगिरी